Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:11:45.947880 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:11:45.953817 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:11:45.984595 GMT+0530

पिकू

पिकू : या माशाचा समावेश सायप्रिनोडोंटिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनोडोंटिडी मत्स्यकुलात करतात. अप्‍लोकाइलस लिनीअटस हे त्याचे शास्त्रीय नाव हे. तो ‘झिर’ या नावानेही ओळखत जातो. त्याची लांबी साधारणत: ८-१० सेंमी. असून जाडी हाताच्या करंगळीएवढी असते.

पिकू

या माशाचा समावेश सायप्रिनोडोंटिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनोडोंटिडी मत्स्यकुलात करतात. अप्‍लोकाइलस लिनीअटस हे त्याचे शास्त्रीय नाव हे. तो ‘झिर’ या नावानेही ओळखत जातो. त्याची लांबी साधारणत: ८-१० सेंमी. असून जाडी हाताच्या करंगळीएवढी असते. हा मुख्यत: गोड्या पाण्यातील मासा आहे; परंतु थोड्या खार्‍या (मचूळ) पाण्यातही तो राहू शकतो. त्याच्या डोक्यावर प्रकाशात चमकणारा एक ठिपका असतो. त्यामुळे काही मच्छीमार त्याला ‘वरडोळ्या’ तर काही, त्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर शिकारीची वाट पाहत निश्चल राहण्याच्या सवयीमुळे ‘तरंग्या’ असेही म्हणतात. ‘टॉपमिनो’ असे त्याचे इंग्रजी नाव आहे. हा मासा लहान असला, तरी त्याचे खरे महत्व डासांच्या अळ्या खाण्याच्या त्याच्या पटाईतपणात आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर फिरण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीमुळे व डासांच्या अळ्या खाण्याच्या त्याच्या विशिष्ट आवडीमुळे अळ्यांच्या नाशाच्या कामी तो फार उपयोगी पडतो. अगदी उथळ पाण्यात जाण्याची सवय व मचूळ आणि थोड्या उष्णही पाण्यात शिरण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तलावांच्या सान्निध्यातिल किंवा नदीकाठच्या गावांच्या सार्वजनिक आरोग्याच्या व डासांचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मासा मानला जातो; त्याचा उपयोग मात्र योग्य रीतीने व्गावयास पाहिजे..

पिकू जातीचा नर मादीपेक्षा जास्त शोभिवंत असतो. त्याच्या अंगावर उभे काळे पट्टे असतात व खवल्यांवर बारीक लाल टिपके असतात. पक्ष (नर) रंगीत असतात. विशेषत: पुच्छपक्ष (शेपटीचा पर) तांबूस लालसर रंगाचा असतो. त्यामुळे हा घरगुती मत्स्यपात्रांत (काचेच्या पात्रात तयार केलेल्या जलजीवालयांत) ठेवण्यास उपयुक्त असतो. त्यासाठी त्याला सर्वत्र मागणी असते. मात्र त्याला काचपात्रातून बाहेर उडी मारण्याची सवय असल्यामुळे पात्रावर झाकण ठेवणे आवश्यक असते.

पिकू जलवनस्पतींत अंडी घालतो व ५-६ दिवसांत अंडी फुटून त्यांमधून पिले बाहेर पडतात.

.पॅचॅक्स, अ. ब्‍लॉकी व अ. डायी या पिकूच्या आणखी तीन जाती आहेत. यांचेही नर शोभिवंत असून ते मत्स्यालयात ठेवण्यास उपयुक्त आहेत.

 

कुलकर्णी, चं. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:11:46.173993 GMT+0530

T24 2019/10/18 04:11:46.180590 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:11:45.888972 GMT+0530

T612019/10/18 04:11:45.907317 GMT+0530

T622019/10/18 04:11:45.936458 GMT+0530

T632019/10/18 04:11:45.937364 GMT+0530