Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:04:40.964309 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:04:40.970102 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:04:40.999169 GMT+0530

पिरान्हा

पिरान्हा : टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब अशीही या माशाची इतर नावे आहेत. चॅरॅसिडी मत्य्कुलातील सेरॅसाल्मस वंशातील पुष्कळ जातींना पिरान्हा हे नाव देतात. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा., अँमेझॉनमध्ये) आढळतात. बहुसंख्य माशांची लांबी सु. ३५ सेंमी. असते; पण मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो. त्यांचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असते.

टायगर फिश, पेराई, पिराया व कॅराइब अशीही या माशाची इतर नावे आहेत. चॅरॅसिडी मत्य्कुलातील सेरॅसाल्मस वंशातील पुष्कळ जातींना पिरान्हा हे नाव देतात. हे मासे मांसाहारी असून द. अमेरिकेत पूर्व व वायव्य भागांतील नद्यांत (उदा., अँमेझॉनमध्ये) आढळतात. बहुसंख्य माशांची लांबी सु. ३५ सेंमी. असते; पण मोठा मासा ६० सेंमी. पर्यंत लांब असतो.

त्यांचे शरीर दोन्ही बाजूंनी पसरट व रुपेरी रंगाचे असते. डोके मोठे असते. त्यांचे जबडे बळकट व दात तीक्ण्त असतात. तोंड मिटलेले असताना वरचे करवतीसारखे दात खालच्या कातरीसारख्या दातांच्या विरुध्द येतात. या मासांच्या झुंडी असतात व नदीच्या पाण्यात येणाऱ्या कोणत्याही प्राण्यावर ते हल्ला करतात व अल्पावधीत त्याचा फडशा पाडतात. त्यामुळे भक्याचा फक्त सांगाडाच शिल्लक राहतो. अनेक वेळा त्यांनी माणसे खाल्ली आहेत.

असे असले, तरी लहान मासे हेच त्यांचे प्रमुख अन्न होय. भक्ष्याच्या वाहणाऱ्या रक्ताच्या वासाने ते इतके आकृष्ट होतात की, काही वेळातच शेकडो पिरान्हा भक्या्रभोवती गोळा होतात. त्यांचे दात एवढे तीक्ण्न असतात की, लचके तोडलेले कळतसुध्दा नाही. गळाने मासेमारी करण्यात ह्यांच्यामुळे अडथळा येतो, कारण गळाला लागलेल्या माशावर ते तुटून पडतात, तसेच ते नेहमीच्या मासेमारी साधनांनी पकडणे अवघड असते. त्यांच्या फार तीक्ण्  दातांनी बहुतेक मासेमारी आकड्यांचे ते सहज तुकडे पाडतात.


जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

2.82608695652
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:04:41.237993 GMT+0530

T24 2019/10/18 04:04:41.245328 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:04:40.905870 GMT+0530

T612019/10/18 04:04:40.925355 GMT+0530

T622019/10/18 04:04:40.953274 GMT+0530

T632019/10/18 04:04:40.954088 GMT+0530