Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/01/19 16:08:55.602874 GMT+0530
शेअर करा

T3 2019/01/19 16:08:55.609262 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/01/19 16:08:55.643370 GMT+0530

सोनमुशी

या माशाचा समावेश काँड्रिक्थीज (उपास्थिमीन) वर्गाच्या सेलेची उपवर्गातील कॅरकॅनिडी कुलात होतो.

सोनमुशी : या माशाचा समावेश काँड्रिक्थीज (उपास्थिमीन) वर्गाच्या सेलेची उपवर्गातील कॅरकॅनिडी कुलात होतो. त्याचे शास्त्रीय नाव स्कॉलीडान सॉरकोव किंवा कॅरकॅरिअस लॅटीकॉडस आहे. तो भारत, श्रीलंका, फिलिपीन्स व वेस्ट इंडीज येथील समुद्रांत आढळतो. त्यास मुशी, यलो डॉग शार्क व ब्लॅक शार्क अशी सर्वसामान्य नावे आहेत. त्याच्या शरीराची लांबी ६० सेंमी. असते. तो मांसाहारी असून लहान मासे, खेकडे व इतर कवचधारी प्राणी हे त्याचे अन्न आहे. तो खादाड असून घ्राणेंद्रियामुळे त्याला लांब अंतरावरून भक्ष्याची चाहूल लागते. त्याची शरीरचना शार्क माशाप्रमाणे असते.

नर व मादी वेगवेगळे असून त्यांच्या शरीराची लांबी ३८-४६ सेंमी. झाल्यावर ते जननक्षम होतात. ते जरायुज असून नर मादीचे मिलन पाण्यात होते. अंड्यांचे निषेचन मादीच्या शरीरात होते. मादी पिलांना जन्म देते. या माशाचा उपयोग खाद्य म्हणून करतात. तसेच त्याच्या यकृतापासून तेल काढतात.

 

लेखक - चंद्रकांत प. पाटील

स्त्रोत - मराठी विश्वकोश

सोनमुशी (कॅरॅकॅरिअस लॅटीकॉडस)

3.0
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/01/19 16:08:56.356524 GMT+0530

T24 2019/01/19 16:08:56.363529 GMT+0530
Back to top

T12019/01/19 16:08:55.515705 GMT+0530

T612019/01/19 16:08:55.540229 GMT+0530

T622019/01/19 16:08:55.590148 GMT+0530

T632019/01/19 16:08:55.591150 GMT+0530