অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधता - वनस्पती

जैवविविधता - वनस्पती

  • अश्वगंधा
  • अश्वगंधा : पाने, फुले व फळे असलेली फांदी.

  • किरमाणी ओवा
  • ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), केसाळ ओषधी [ओषधि] इंग्‍लंड ते मंगोलिया, पश्चिम हिमालय, तिबेट, बलुचिस्तान इ. प्रदेशांमध्ये आढळते.

  • कॅथरिन ईसॉ
  • अमेरिकन स्त्री वनस्पतिशास्त्रज्ञ. विषाणू [व्हायरस] व त्यांचा वनस्पतींवर होणारा परिणाम यांसंबंधी विशेष महत्त्वाचे कार्य.

  • अँजिलोनिया
  • या वनस्पति-वंशाचा समावेश फुलझाडांपैकी (द्विदलिकित वर्गातील) स्क्रोफ्यूलॅरिएसी या कुलात होतो.

  • अँटिऱ्हा‍यनम
  • बहुवर्षायू (पुष्कळ वर्षे जगणारी) ओषधी मूळची भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून भारतात सु. १,३९५ मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात तिची बागेत शोभेकरिता वर्षायू (एक वर्ष जगणारी) म्हणून लागवड करितात.

  • अंकुरण
  • अंकुरण म्हणजे अंकुर येणे किंवा फुटणे.

  • अंकोल
  • एक पानझडी, काटेरी, ६-१२ मी. उंच व ०.६-०.९ मी. घेराचा लहान वृक्ष असून भारतात (उपहिमालय ते सह्याद्री व मद्रासपर्यंत) तो साधारण रुक्ष ठिकाणी आढळतो;

  • अंजन - २
  • गुरे व घोडे पाला आवडीने खातात व त्याचे खत चांगले होते.

  • अंजनवेल
  • शोभेकरिता अनेक ठिकाणी लावली जाणारी ही वेल भारतात सर्वत्र जंगलात आढळते;

  • अंजीर
  • हा लहान पानझडी वृक्ष मूळचा बलुचिस्तान, पूर्वभूमध्ये समुद्राभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया येथील आहे.

  • अंजीर
  • अंजीर या वृक्षाची उंची सुमारे ३-१० मी. पर्यंत आढळते. याच्या फांद्या मऊ आणि राखाडी रंगाच्या असतात. पाने सु. १२-२५ सेंमी. लांब आणि सु. १०-१८ सेंमी. रुंद असून ती हृदयाकृती, किंचित खंडित व दातेरी असतात.

  • अंतःप्रजनन
  • निकट संबंध अथवा जवळचे नाते असलेल्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या लैंगिक संबंधापासून होणाऱ्या प्रजोत्पादनाला (प्रजननाला) अंतःप्रजनन म्हणतात.

  • अंबरी
  • सु. ४-५ मी. उंचीच्या या मध्यम वृक्षाचा प्रसार कोकण व उत्तर कारवारच्या सदापर्णी जंगलात असून शिवाय निलगिरी, त्रावणकोर व श्रीलंका येथेही आहे.

  • अंबाडा
  • (रान-आंबा; हि. अम्रा; क. अमटे, अवटेकाई; सं. आम्रतक; इ. बाइल ट्री, इंडियन हॉग प्लम; लॅ.स्पाँडियास मँजिफेरा; कुल-अ‍ॅनाकार्डिएसी).

  • अंबाडी
  • सु. ३-४ मी. उंचीचे हे सरळ वाढणारे, वर्षायू व काटेरी झुडूप मूळाचे आफ्रिकेतील असून भारतात व पाकिस्तानात याची लागवड करतात.

  • अंबाश
  • कूड बळकट, चिवट, पांढरे, भेंडासारखे हलके व विरळ असून ते खाटा, स्टुले यांकरिता व पाण्यात तरंगण्यात (तराफे, पडाव इ.) उपयुक्त असते.

  • अंबेलेलीझ
  • (चामर-गण; लॅ. अंबेलिफ्लोरी ). चवरी (चामर) सारखे फुलोरे असणाऱ्या फुलझाडांचा एक गण.

  • अक्कलकारा
  • या वर्षायू औषधीचा प्रसार सर्व उष्ण देशांत, श्रीलंका व भारत यांतील जंगलात सर्वत्र असून बागेतूनही ती लावतात.

  • अक्रोड
  • भारतात तो हिमालयात व आसामात (९३० –३,४०० मी. उंचीपर्यंत) आढळतो.

  • अगरू
  • हा मध्यम उंचीची व सदापर्णी वृक्ष ब्रह्मदेश, पूर्व हिमालय, बंगाल, भूतान, आसाम इ. प्रदेशांत आढळतो.

  • अगस्ता
  • अगस्ता : (हदगा, अगती; हिं. हतिया; गु. अगथियो; क. अगस्ते; सं. अगस्ति, दीर्घशिंबी, व्रणारी; इं. अगाती; लॅ.सेस्बॅनिया ग्रँडिफ्लोरा, कुल—लेग्युमिनोजी, पॅपिलिऑनेटी). हा शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष दिसतो.

  • अजमोदा
  • ही ६०-९० सेंमी. उंच व वर्षायू ओषधी मूळची समशीतोष्ण यूरोपातील असून इंग्लंड ते आशिया मायनर या प्रदेशात आढळते.

  • अट्टाक
  • या मध्यम आकाराच्या काटेरी वृक्षाचा प्रसार कोकण, प. घाट व कारवार येथील सदापर्णी जंगलात आहे.

  • अतिविष
  • अतिविषाची मुळी वाजीकर (कामोत्तेजक), स्तंभक (आकुंचन करणारी), शक्तिवर्धक असून अतिसार, आमांश, खोकला व पाळीचा ताप यांवर गुणकारी आहे.

  • अत्रुण
  • कुंपणाच्या कडेने ही झाडे लावतात. पाने गुरेढोरे खातात. याचे फिकट लालसर व कठिण लाकूड नांगर, वासे, खांब, कोळसा इत्यादींकरिता उपयुक्त असते.

  • अनंत - २
  • पुष्कळ वर्षांपेक्षा वर्षभरच झाडे ठेवणे फायदेशीर असते. कळ्या आल्यावर खत दिल्यास फुले मोठी होतात.

  • अनंतमूळ
  • अनंतमूळ : (उपरसाळ, अनंतवेल; हि. हिंदी सालस; क. मगरबू; इं. इंडियन (कंट्री) सार्सापरिला, लॅ. हेमिडेस्मस इंडिक्स, कुल—ॲस्क्लेपीएडेसी).

  • अननस
  • या प्रसिद्ध खाद्याफळाचे झुडूप (क्षुप) सु. १·५ मी. उंच व द्विवर्षायू असून ते मूळचे दक्षिण अमेरिकेतील आहे.

  • अपित्वचा
  • कोशिकावरणाची जाडी सर्वत्र सारखी नसते. एक्विसीटम व डायाटम यांच्या कोशिकावरणात सिलिका असते.

  • अपिवनस्पती
  • अपिवनस्पती दुसर्‍या वनस्पतीच्या फांदीवर किंवा खोडावर वाढतात. आपले अन्न व पाणी आधारभूत वनस्पतीच्या शरीरातून किंवा मुळांद्वारे जमिनीतून शोषून न घेता स्वतंत्रपणे मिळवून ते जीवनक्रम चालवितात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate