অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंजनवेल

अंजनवेल

(क. अड्केबीलुबळ्ळी; गु. अडूनी वेल; लॅ.पोथॉस स्कँडेंस; कुल-अ‍ॅरॉइडी). शोभेकरिता अनेक ठिकाणी लावली जाणारी ही वेल भारतात सर्वत्र जंगलात आढळते; इतर झाडांवर किंवा भिंतीवर आगंतुक मुळ्यांनी चढते. खोड बोटाइतके जाड व बळकट असून त्यावर अनेक फांद्या येतात. कांडी लहान व पाने एकाआड एक, लहान, विविध, परंतु गोलसर, गुळगुळीत, चकचकीत, चिवट; देठ सपक्ष व लांब; तळ अर्धसंवेष्टी (खोडास अंशत : वेढणारा); पिवळे स्थूलकणिश [पुष्पबंध] व हिरवा नावेसारखा महाछद, लांबीत सारखे; फुले (मे-जुलै) द्विलिंगी; परिदले सहा, केसरदले सहा व त्यांच्या टोकांस परागकोश [फूल]; किंजपुट लंबगोल, तीन कप्प्यांचा; प्रत्येक कप्प्यात बीजक एकच; किंजल नसते. मृदुफळ फार लहान, चपटे व शेंदरी असते.

पानांची पूड देवीच्या आजारात अंगास लावतात; खोडाचे तुकडे कापरासह तंबाखूप्रमाणे दम्याच्या विकारात ओढतात.

लेखक : प्र. भ.वैद्य

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 12/18/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate