অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अतिविष

अतिविष

(हिं. अतविका, अतिस; लॅ.ॲकॉनिटम हेटेरोफायलम, कुल-रॅनन्क्युलेसी). बचनागाच्या वंशातील व त्यासारखी ही ओषधीय जाती [ओषधि] हिमालयात २,०००—५,००० मी. उंचीपर्यंत सापडते; हिंदुकुश ते काराकोरमपर्यंत ही पसरली आहे. हिची पाने साधी, एका आड एक व दातेरी; फुले पिवळी किंवा फिकट निळी; घोसफळात पाच लहान पेटिकाफळे [फळ]; मुळे राखी असून चांगल्या दर्जाची चटकन मोडतात; उघडा भाग रवाळ व दुधासारखा पांढरा असतो (चित्रपट ५५). ती अतिशय कडू असतात. त्वचेस स्पर्श झाल्यास चुणचुणत नाही. त्यात ॲटिसीन नावाचे बिनविषारी अस्फटिक अल्कलॉइड (वनस्पतींत निसर्गत: आढळणारे कार्बनी क्षारक, अल्कलॉइड) ४० टक्के असते. थोड्या प्रमाणात घेतल्यास ॲकॉनिटिनाप्रमाणे विषबाधा होत नाही. आदिवासी याची पाने भाजीकरिता वापरतात. फार प्राचीन काळापासून तापावर व शक्तिवर्धक म्हणून वापरात आहे. अतिविषाच्या पांढऱ्या भुकटीत कधी शतावरीच्या मुळ्यांच्या भुकटीची भेसळ करून विकतात; अतिविषाची मुळी वाजीकर (कामोत्तेजक), स्तंभक (आकुंचन करणारी), शक्तिवर्धक असून अतिसार, आमांश, खोकला व पाळीचा ताप यांवर गुणकारी आहे.

लेखक : म. वा. ठोंबरे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/30/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate