অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आयसॉएटेलीझ

आयसॉएटेलीझ

(इं. क्विलवर्ट्स).वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरस यांची ने-आण करणारे शरीरघटक असणाऱ्या) अबीजी वनस्पतींपैकी हा प्ल्यूरोमिया : (१) मुळे, (२) मूलदंड, (३) खोड, (४) पाने, (५) शंकू.प्ल्यूरोमिया : (१) मुळे, (२) मूलदंड, (३) खोड, (४) पाने, (५) शंकू.एक गण असून आयसॉएटेसी व प्ल्यूरोमिएसी या दोन कुलांचा यात समावेश होतो. प्ल्यूरोमिया हा जीवाश्म (अवशेशरूपी) वंश  आयसॉएटिस व  लेपिडोडेंड्रेलीझ (जीवाश्मगण) यांना सांधणारा दुवा मानतात, कारण खालील लक्षणांत त्याचे आयसॉएटिसशी साम्य आढळते :(१) खोडाची संरचना, (२) जिव्हिकावंत पर्ण, (३) मुळाची संरचना, (४) बीजुककोश (लाक्षणिक प्रजोत्पादक अंग म्हणजे बीजुक धारण करणारा पिशवीसारखा भाग). प्ल्यूरोमिया हा विलुप्त वंश मध्य ट्रायासिक कल्पातील असून युरोपात व पूर्व आशियात त्यांचे जीवाश्म आढळले आहेत. आयसॉएटाइट्स या नावाचा जीवाश्म वंश पूर्व क्रिटेशस कल्पातील असून त्याचा विद्यमान आयसॉएटिस वंशाशी निकटचा संबंध आहे व या दोन्हींचा आयसॉएटेसी कुलात अंतर्भाव केला आहे. प्ल्यूरोमिएसी कुलातील प्ल्यूरोमिया हा एकच वंश पूर्णपणे माहीत झाला आहे. या गणातील वनस्पती ओषधीय [ ओषधि] किंवा क्वचित लहान वृक्षासारख्या परंतु असमबीजुक असतात. खोडाच्या तळाशी मूलदंड (मुळे धारण करणारा दंड) ; पाने लहान वा जिव्हिकावंत;बीजुकपर्णे (बीजुके धारण करणारी रूपांतरित पाने) शंकूसारख्या इंद्रियामध्ये एकत्र किंवा विरळपणे मांडलेली; बीजुककोशांत प्रपट्टिका (आडवे पडदे) व बीजुककोश यूस्पोरँजिएट पद्धतीने [ वनस्पति, वाहिनीवंत अबीजी] बनलेले;विद्यमान वंशात रेतुके (चल पुं-जनन कोशिका) बहुकेसली (केसासारखी अनेक उपांगे असलेली) व खोडात द्वितीयक वाढ आढळते. ट्रायासिक काळापासून (साडे अठरा कोटी वर्षांपूर्वीपासून) ते आजपावेतो या गणातील प्रतिनिधींची परंपरा चालू आहे.

लेखक : प्र. भ. वैद्य

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate