অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आरारूट

आरारूट

(इं. आरारूट). व्यापारी क्षेत्रात आरारूट हे नाव खाद्य पिठाला दिले असून हे ज्या अनेक वनस्पतींपासून काढतात त्यात पुढील वनस्पतींचा समावेश होतो : वेस्ट इंडियन अ‍ॅरोरूट (मॅरेंटेसी-कुलातील मॅरांटा अ‍ॅरुंडिनॅशिया ); क्वीन्सलँड अ‍ॅरोरूट (कॅनेसी-कुलातील कॅना इड्‌यूलिस नावाची  कर्दळ); ईस्टइंडियन अ‍ॅरोरूट (झिंझिबरेसी-कुलातील कुर्कुमा अंगुस्तीफोलिया, तवकीर); फ्लॉरिडा अ‍ॅरोरूट

आराख्ट (वेस्ट इंडियन अ‍ॅरोख्ट) :  (१) ग्रंथिक्षोडासह वनस्पती, (२) फूल.आराख्ट (वेस्ट इंडियन अ‍ॅरोख्ट) : (१) ग्रंथिक्षोडासह वनस्पती, (२) फूल.

(सायकेडेसी-कुलातील झॅमिया फ्‍लॉरिडॅना); टाका अ‍ॅरोरूट (टाका पिनॅटिफिडा); ब्राझिलियन अ‍ॅरोरूट (कसावा; मॅनिहॉट एस्क्युलेंटस) इ. यांची ग्रंथिक्षोडे (बटाट्यासारखी गाठदार खोडे) सोलून, धुऊन व कुटून तो लगदा चाळणीच्या रुंद नळ्यांतून गाळतात व त्यातून मिळणारा पिठूळ पदार्थ पाण्याबरोबर टाक्यात जमल्यावर वाळवितात. हा नंतर बाजारात पांढरीस्वच्छ पूड अथवा लहानमोठ्या खड्यांच्या स्वरूपात मिळतो.हे पीठ पचण्यास हलके असल्याने लहान मुलांना व अशक्त माणसांना चांगले मानवते; बिस्किटे, केक, पुडिंग व जेली यांत त्याचा उपयोग करतात, शिवाय सरस व चेहऱ्यास लावण्याची सुवासिक पूड यांकरिताही उपयोगात आहे. लगद्याचा चोथा गुरांना चारा म्हणून घालतात.

वेस्ट इंडियन अ‍ॅरोरूट : ही बारीक ०·६ - १·८ मी. उंचीची ओषधी मूळची उष्ण अमेरिकेतली असून वेस्ट इंडीजमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहे; भारत, श्रीलंका, इंडोचायना इ. देशांत पिकवितात; भारतात क्वचित जंगलात आढळते, परंतु मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, बंगाल, आसाम व केरळ येथे लागवड केली जाते. हिचे खोड भाजून किंवा शिजवून खातात. नवीन लागवड खोडाच्या तुकड्यांनी करतात. हलकी, चांगला निचरा असलेली जमीन व साधारण सावली या पिकाला आवश्यक असते. पिवळे व निळे खोड असलेले दोन प्रकार असून निळ्या खोडापासून अधिक स्टार्च मिळतो. दर हेक्टरी ९-१९ टन व जास्तीत जास्त २९·५ टन खोडाचे तुकडे निघतात व त्यात २५-३० टक्के स्टार्च असतो; प्रत्यक्षात मात्र १५ टक्केच स्टार्च मिळतो.

रोग :उ. मलबारात पानांवर पेलिक्युलेरिया फिलॅमेंटोजा ह्या कवकामुळे पांढरट तपकिरी रंगाचे पट्टे पडतात; पुढे पाने कुजतात. पावसाळ्यापूर्वी १ टक्का बोर्डो-मिश्रण दोन्ही बाजूंस फवारल्यास ते रोगप्रतिबंधक ठरते.

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate