অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्निका माँटॅना

आर्निका माँटॅना

(इं. आर्निका, मौंटन टोबॅको; कुल - कंपॉझिटी).  सु. ०·३ मी. उंचीची ही लहान बहुवर्षायु (पुष्कळ वर्षे जगणारी) ओषधी  मूळची उत्तर अमेरिका, आशिया, यूरोप येथील आहे.  हिचे मूलक्षोड खोड  बारीक, चिवट व तपकिरी रंगाचे असून त्याला खाली मुळे व जमिनीवर बिनदेठाच्या, रुंदट भाल्यासारख्या गुळगुळीत, अखंड पानांचा गुच्छ असतो.  हिचा पिवळा स्तबक [ कंपॉझिटी] फुलोरा लांब केसाळ दांड्यावर येतो.  सुके स्तबक, मूलक्षोड आणि मुळे औषधी असून ठेचलेल्या, लचकलेल्या व खरचटलेल्या भागांवर बाहेरून मद्यार्कातून लावतात.  वनस्पतीचे वरील भाग शक्तिवर्धक, जखम भरून काढणारे व क्षोभकारक आहेत.  या वनस्पतीत आर्निसीन नावाचे कटुद्रव्य व शेकडा ०·५ बाष्पशील तेल असते.  आर्निका-मद्यार्क शरीरात टोचल्यास प्रथम रक्तदाब कमी होतो परंतु नंतर बराच वाढतो.  ही ओषधी उत्तेजक, शामक व सूज उतरविणारी आहे.  ती बागेत शोभेकरिता वाफ्याच्या कडेने लावतात.

लेखिका : पुष्पलता द आफळे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate