অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आळू

आळू

(आतू; हिं. मोइना; क. गुंदकरे, मुल्लकरे; सं. पिंडू; लॅ. वँगुरिया स्पायनोजा; कुल-रूबिएसी). हा लहान काटेरी पानझडी वृक्ष पेगू (ब्रह्मदेश), जावा, भारत (उ. बंगाल, प. द्वीपकल्प, दख्खन,कारवार वगैरे) इ. भागांत आढळतो. काटे सरळ, तीक्ष्ण, संमुख (समोरासमोर), क्वचित त्रिखंडी व लांब; साल गर्द व गुळगुळीत; पाने ५–१२ सेंमी. लांब, पातळ, आयत, गुळगुळीत व लांबट टोकाची; फुले लहान, पांढरट हिरवी व वल्लरीवर जानेवारी-एप्रिलमध्ये येतात. सामान्य संरचना व लक्षणे रूबिएसी  कुलात वर्णिल्याप्रमाणे. सवंर्त पेल्यासारखा, पुष्पमुगुट-नलिका पसरट व आत कंठाशी केसाळ [फूल]; अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळ २·५ सेंमी. व्यासाचे, गोलसर, गुळगुळीत, पिकल्यावर पिवळट गर्द तपकिरी व खाद्य असून त्यात ४-५ कठीण अष्ठी (आठळ्या) असतात. फळ फारसे चविष्ट नसले तरी गरीब लोक खातात. पाला गुरांना चारा म्हणून घालतात. पानांचे चूर्ण घटसर्पावर देतात; फूल पित्तवर्धक, प्रशीतकर (थंडावा देणारे) असते आणि कफ व पित्त बाहेर पडण्यास साहाय्य करते.

लेखिका  : कमला श्री. हर्डीकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate