অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकदांडी

एकदांडी

(दगडी; लॅ. ट्रॉयडॅक्स प्रोकंबेन्स; कुल-कंपॉझिटी). ओसाड व बहुधा रुक्ष जागी आढळणारी एक तणासारखी, बहुवर्शायू (अनेक वर्षे जगणारी), अर्धवट जमिनीसरपट वाढणारी, सु. ३०–६० सेंमी. उंचीची व केसाळ अशी ही  ओषधी  मूळची मध्य अमेरिकेतील; तथापि श्रीलंकेत व भारतात (विशेषत: महाराष्ट्रात) तिचा प्रसार सर्वत्र आहे. पाने साधी, जाड, समोरासमोर, अंडाकृति-दीर्घवृत्ताकृती, टोकदार, दातेरी काठाची व प्रपिंडयुक्त (ग्रंथियुक्त) असतात. लहान फुलोरे (स्तबक) एक एकटे असून लांब व बारीक दांड्यायर वर्षभर येतात. हिरवट छदांची दोन मंडले, त्यांमध्ये बाहेर पिवळी, जिव्हिकाकृती, स्त्रीलिंगी, किरण-पुष्पके व आत अनेक, लहान, द्विलिंगी, बिंब-रस कापणे, खरचटणे व जखमांवर लावल्यास चांगला उपयुक्त असतो;

लेखक : शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 4/13/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate