অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एरिकेलीझ

एरिकेलीझ

एरिकेलीझ

फुलझाडांपैकी द्विदलिकित [→ वनस्पति, आवृतबीजी उपविभाग] वनस्पतींचा एक गण. ह्यामध्ये एकूण पाच कुले असून एरिकेसी हे प्रमुख कुल आहे. जिरॅनिएलीझ व गटिफेरेलीझ ह्यांपैकी एकापासून एरिकेलीझ हा गण अवतरला असावा अशी विचारसरणी बेसी, हॅलियर, वेटश्टाइन इत्यादींना मांडली आहे. या गणातील बहुतेक सर्व वनस्पती काष्ठमय वृक्ष किवा क्षुपे (झुडपे) आणि काही ओषधी [→ ओषधि] असून त्यांचा प्रसार भारत, पूर्व आशिया, अमेरिका, कॅनडा, आफ्रिकेतील उष्ण प्रदेश, यूरोप इ. प्रदेशांत आहे. पाने बहुधा चिवट व कधी सुईसारखी बारीक; फुले द्विलिंगी, अर-समात्र, बहुधा पंचभागी, सामान्यपणे अवकिंज; संदले कधी सुटी; प्रदले बहुधा जुळलेली; केसरदले सुटी व मधुस्त्रावक बिंबाकडेने चिकटलेली; काहींत परागांच्या चौकड्या; किंजपुट क्वचित अध:स्थ; बीजके एकावरणी व अक्षलग्‍न [→ फूल]; फळे शुष्क (बोंड) किंवा मांसल (मृदुफळ); काहींत बिया सपक्ष (बाह्य आवरणाचा पंखासारखा विस्तार असलेल्या) असतात.

रिकेसी कुलातील काही जातींची फळे (उदा. ब्ल्यूबेरी, कॉर्नबेरी, क्रेनबेरी) खाद्य असतात. एरिका आबोंरिया या जातीचे लाकूड कठीण असून चिलिमीकरिता वापरतात. ⇨र्‍होडोडेंड्रॉनच्या अनेक जाती हिमालयात आढळतात. काहींच्या मुळात कवकतंतू [संकवक, → कवक] असतात. ह्याच कुलातील अझेलियार्‍होडोडेंड्रॉन या वंशांतील काही जाती बागेत शोभेकरिता लावतात. निसर्गत: अनेक जाती अम्‍लीय व अतिथंड जमिनीत वाढतात.


लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate