অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ओलिएसी

ओलिएसी

(पारिजातक कुल). फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील जेन्सिएनेलीझ  ह्या गणात ह्या वनस्पति-कुलाचा समावेश होतो. ह्यातील वनस्पती विशेषतः समशीतोष्ण व उष्ण कटिबंधांतील प्रदेशांत आढळतात व त्यात सु. २२ वंश व ५०० जाती आहेत. जाई-जुईच्या (जस्मिनम) वंशामध्ये सु. २०० जाती आहेत. या कुलातील वनस्पती क्षुपे (झुडपे), वृक्ष व वेली असून पाने साधी अथवा संयुक्त असतात. फुलोरे विविध प्रकारचे असून फुले सर्वसाधारणतः द्विलिंगी, नियमित, अपिकिंज व बहुधा सुवासिक असतात. संवर्तात चार संदले (क्वचित चार ते पंधरा किंवा नसतात); प्रदलमंडलात चार ते पाच बहुधा जुळलेल्या पाकळ्या (क्वचित चार ते बारा किंवा नसतात); हे मंडल समईसारखे दिसते. केसरदले दोन क्कचित चार; किंजमंडल दोन जुळलेल्या दलांचे, ऊर्ध्वस्थ, दोन कप्प्यांचे; प्रत्येक कप्प्यात दोन बीजुके [फूल]; फळे विविध. परागण (परागसिंचन) कीटकांकरवी घडते. जाई, जुई, चमेली, सायली, मोगरा, पारिजातक इ. बागेतील सुवासिक फुलांच्या वनस्पती तसेच करंबा, हेदी, मोखा,अ‍ॅश व ऑलिव्ह ह्यांसारख्या लाकूड, तेल वगैरे देणाऱ्या उपयुक्त वनस्पती याच कुलातील आहेत.

लेखक : वा. द. वर्तक

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate