(लॅ. पामेंटिएरा सेरीफेरा; कुल-बिग्नोनिएसी). हा लहानसा वृक्ष मूळचा पनामातील (मध्य अमेरिका) असून शोभेसाठीरस्त्याच्या दुतर्फा लावतात.
भारतातही तो लावलेला आढळतो. पाने संयुक्त त्रिदली व देठ सपक्ष असतो; दलेदीर्घवृत्ताकृती व टोकदार असतात. फुले खोडापासूनकिंवा फांद्यांपासून एकेकटी एप्रिल-जूनमध्ये येतात; तीपांढरट गुलाबी असतात. संवर्त घंटाकृती वमहाछदाप्रमाणे; पुष्पमुकुट मोठा, घंटाकृती, खाली रुंदनळीसारखा व वर पाच पसरट तरंगित पाकळ्यांचा; केसरदले चार, दीर्घद्वयी; किंजपुट दोन कप्प्यांचा आणिअनेक बीजकांनी भरलेला [→ फूल]; बोंड लांबट, दंडाकृती, न तडकणारे, पांढरे, मेणबत्तीसारखे (त्यावरून इंग्रजी नाव पडले) व लोंबते असते.
फळे पनामातील काही लोक खातात व तसेच गुरांनाही खाऊ घालतात. पाने, फळे व मुळे यांत हायड्रोसायानिक अम्लाचा अंश असतो.
लेखक: सुधाकर देशपांडे
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020