অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कँपॅन्यूलेलीझ

कँपॅन्यूलेलीझ

कँपॅन्यूलेलीझ

(घंटापुष्प गण). फुलझाडांच्या (आवृतबीज, द्विदलिकित) एका गणाचे नाव.यामध्ये एकूण चार मुख्य कुले [कँपॅन्यूलेसी, गुडेनिएसी, स्टायलिडेसी व ⇨कंपॉझिटी], सु. ९००च्यावर वंश व १६,९२० जाती असून बहुतेक सर्व ओषधी [→ ओषधि], क्षुपे (झुडपे) व क्वचित वृक्ष आहेत.

सर्व कुले सामान्यपणे अधिक प्रगत असून त्यांचा प्रसार सर्वत्र आहे. पुष्पबंध, परागकोश, किंजमंडल व फळे यांसंबंधीच्या लहानमोठ्या फरकांवरून भिन्न कुले ओळखली जातात. सर्व जातींत सामान्यपणे चीक असलेल्या नलिका किंवा तैलनलिका असतात.

पुष्पबंध अकुंठित [→ पुष्पबंध]; फुले द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, अरसमात्र किंवा एकसमात्र, अपिकिंज व पंचभागी; परागकेसर पूर्णपणे किंवा अंशतः जुळलेले, किंजदलांची संख्या इतर दलांपेक्षा कमी व किंजदले जुळलेली; किंजपुट बहुधा अध:स्थ [→ फूल]; फळे भिन्न प्रकारांनी फुटणारी बोंडे. देवनळ, सहदेवी, सूर्यफूल, करडई, अ‍ॅस्टर, झिनिया इ. उपयुक्त वनस्पती ह्या गणातीलच आहेत.

 

लेखक: सुशीला प. घन

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 11/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate