অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कंवडळ

कंवडळ

(कडू वृंदावन, मुकल; हिं. लाल इंद्रायण; गु. रतन इंद्रायण; क. अवगुडे हण्णू; सं. चित्रा, महाकाल, कमंडलू, लॅ. ट्रायकोसँथस पामेटा; कुल-कुकर्बिटेसी). सु. नऊ मी. उंचीपर्यंत वाढणारी ही मोठी वेल मलाया, चीन, जपान, उत्तर ऑस्ट्रेलिया, भारत, श्रीलंका इ. प्रदेशांत विशेषत: टेकडयांवर जंगली अवस्थेत आढळते; हिमालयात ती १,५०० मी. उंचीपर्यंत आढळते. पाने विविध, साधी, काहीशी हस्ताकृती विभागलेली; खंड ३ — ५, दातेरी व त्यांच्याखालील बाजूंवर विविधरंगी पट्टे. प्रताने (तनावे) त्रिशाखी; फुले सच्छद; एकलिंगी; पुं-पुष्पे पानाच्या बगलेत ५ — १० च्या मंजऱ्यात व स्त्री-पुष्पे एकेकटी एप्रिल-जुलैमध्ये येतात. पाकळ्या पांढऱ्या व त्यांच्या कडा फणीप्रमाणे असतात [ फूल]. मृदुफळे गोल, पिकल्यावर लाल व त्यावर दहा नारिंगी रेषा; व्यास ३ — ८ सेंमी.; बिया अनेक.

मुळाचा लेप कडू इंद्रायणाच्या मुळाबरोबर गळवांवर व मोहरीच्या तेलात मूळ उकळून डोकेदुखीवर लावतात. गुरांच्या फुप्फुसाच्या विकारावर मूळ उपयुक्त असते. फळ दम्यावर तंबाखूप्रमाणे ओढतात. खोबरेलात किंवा तिळेलात फळाचा कडू मगज (गर) उकळून डोक्यास लावल्यास अर्धशिशी व नाकातील दुर्गंधी स्रावावर परिणामकारक. फळ तीव्र रेचक असून पोटात घेतल्यास पाण्यासारखे ढाळ होतात. अनेक गुणधर्म कडू इंद्रायणाप्रमाणे.

लेखक :  शं. आ. परांडेकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate