অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कपूरीमधूरी

कपूरीमधूरी

कपूरीमधूरी

(कपुरफुटी; हिं. गोरखबुटी, कपुरीजडी; सं. कर्पुरमाधुरी; लॅ. एरुआ लॅनॅटा कुल-अ‍ॅमरँटेसी). भारत, श्रीलंका, अरबस्तान, आफ्रिका,जावा, फिलिपीन्स इ. प्रदेशांत सर्वत्र तणासारखी वाढणारी लहान ओषधी. फांद्या अनेक; पाने एकाआड एक व केसाळ; फुले द्विलिंगी, लहान, पांढरी,बिनदेठाची, कक्षास्थ (बगलेत) स्तबकात वा कणिशात [Ž पुष्पबंध] ऑगस्ट-नोव्हेंबरात येतात.

छदके खोलगट; परिदले पाच व केसाळ; केसरदले पाच,वंध्यकेसराशी एकांतरित (एकाआड एक) व तळाशी जुळून नलिका अगर पेला बनलेला [Ž फूल]. शुष्क व एकबीजी फळ (क्लोम).

ही ओषधी कृमिनाशक व मूत्रल (लघवी साफ करणारी) आहे. मूळ वेदनाहारक व मूत्रल; डोकेदुखीवर आणि कफावर गुणकारी. दम्यावर सुकी पाने व फुले चिलमीतून ओढतात.


 

लेखक: द. सी. चौगले

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate