অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

करंबा

करंबा

करंबा

(पारजांब, लौकी, एडणा; क. अक्की, हेजे-अकरकाल, मुदला; इं. इंडियन ऑलिव्ह, रोझ सँडलवुड ट्री; लॅ. ओलिया डायोइका; कुल-ओलिएसी). ऑलिव्हच्या वंशातील हा वृक्ष सदापर्णी असून भारतात भरपूर पाऊस असणाऱ्या घाटमाथ्यावर, कोकण भागात, आसाम व बंगालमधील टेकड्यांवर आढळतो.

तो विभक्तलिंगी (एकलिंगी) व मध्यम आकाराचा असतो. पाने ७ - १३ × ५ -६ सेंमी.; दीर्घवृत्त्ताकृती, भाल्यासारखी, थोडी दातेरी, जाडसर व गुळगुळीत असतात. फुले लहान (स्त्री-पुष्पे थोडी मोठी ) शुभ्र व पानाच्या बगलेत अथवा आसपास उगवणाऱ्या परिमंजरीवर जानेवारी ते एप्रिलमध्ये येतात; ती बहुधा द्विलिंगी किंवा एकलिंगी (पुं-पुष्पे) असतात. फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त) व एकबीजी; बी कडू, लंबगोल, वाटाण्याएवढे व जांभळट असते.

जून लाकूड लालसर वा पिंगट व कापल्याबरोबर सुवासिक असते म्हणून तसे इंग्रजी नाव पडले. ते कठीण, खरबरीत, मजबूत असून कपाटे व मुख्यत: कातीव व कोरीव (नक्षीदार) वस्तूंसाठी वापरतात. झाडाची साल ज्वरनाशक असते.


 

लेखक: वा. द. वर्तक

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate