অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कसीली

कसीली

कसीली

(करंडी; लॅ. अ‍ॅब्युटिलॉन म्युटिकम; कुल-माल्व्हेसी). कापूस, जास्वंद, व भेंडी यांच्या कुलातील या लहान केसाळ झुडपाचे ⇨मुद्रा व ⇨चिनी ताग ह्यांच्याशी बरेच साम्य असून ते  पाकिस्तानात आणि भारतात सामान्यपणे सर्वत्र आढळते; तथापि कोकणात व दक्षिण पठारावर  कोठेही रस्त्याच्या कडेने किंवा कचऱ्याच्या ढिगावरही आढळते.

पाने साधी (७.५-१० सेंमी.  व्यासाची) लांब देठाची, गोलसर, हृदयाकृती, दातेरी व सोपपर्ण (उपपर्णासह); फुले लालसरपिवळी, मुद्रेच्या फुलांपेक्षा मोठी, पानांच्या बगलेत एकेकटी, जानेवारी-जूनमध्ये येतात.

किंजदले सु.पंचवीस [→ फूल]; फळ (बोंड) साधारण गोलसर, टोकास खोलगट, फारच केसाळ; प्रत्येक किंजदलात तीन लवदार बिया. खोड व फांद्यांपासून उपयुक्त धागे काढून त्यांपासून साध्या दोऱ्या व तत्सम वस्तू बनवितात. बिया पौष्टिक असल्याने दुष्काळात त्यांची पूड ज्वारीच्या पिठात मिसळून भाकरी करतात किंवा बियांची कांजी करून पितात.

 

 

लेखक: शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate