অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काँजिया टोमेंटोजा

काँजिया टोमेंटोजा

काँजिया टोमेंटोजा

(कुल-व्हर्विनेसी). की एक मोठी प्रतानारोही (तनाव्यांच्या साहाय्याने वर चढणारी) वेल मूळची ब्रम्हदेश, थायलंडआसाम इ. प्रदेशांतील असून उत्तर भारतात बरीच लागवडीत आहे;

शोभेकरिता महाराष्ट्रातही बागेत लावलेली आढळते. अ‍ॅझूरिया नावाचा प्रकार महाराष्ट्रात विशेष लावतातउत्तर भारतातऑब्लॉंगीफोलिया हा प्रकारही अधिक आढळतो. नावाप्रमाणे टोमेंटोजा प्रकार अधिक लवदार असतो.

याची पाने संमुख (समोरासमोर)आयत१०-१२ X ५-१० सेंमी.वरून खरबरीतखालून केसाळ व उठावदार शिरांचीया वेलीची निळसर पांढरीलहान फुले केसाळ व अग्रस्थ (शेंड्यावरील) परिमंजरीवर जानेवारी-मेमध्ये येतात. छदे व छदके मोठीप्रत्येक वल्लरीखाली तीन छदकांचे व वाटीसारखे फिकट लाल वा निळे मंडल असते.

संवर्त नसराळ्यासारखापुष्पमुकुट नलिकाकृती [फूल]. इतर लक्षणे व्हर्बिनेसीकुलात वर्णिल्याप्रमाणेबोंड तडकत नाही. बिया व कांड्या यांपासून नवीन लागवड करतात.

 

लेखक: द. सी. चौगले

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/28/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate