অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काँबेटम कॉक्सीनियम

काँबेटम कॉक्सीनियम

काँबेटम कॉक्सीनियम

(लॅ. पॉइव्हरिया कॉक्सीनियाकुल-कॉंब्रेटेसी). ही सदापर्णी शोभिवंत वेल मूळची मॅलॅगॅसी व मॉरिशस येथील असून शोभेसाठी बागेत लावतात. खोड व फांद्या बारीक; पाने लांबट, अंडाकृती व भाल्यासारखी, तळास व टोकास निमुळती, कडेने काहीशी तरंगित, गर्द हिरवी व चकचकीत;

फुले लहान व भडक किरमिजी असून दाट, शोभिवंत व झुबकेदार मंजऱ्यांवर किंवा परिमंजऱ्यांवर फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये येतात. संवर्त पेल्यासारखा, पाकळ्या चार, केसरदले आठ व बाहेर डोकावणारी; किंजपुट अधःस्थ ; [फूल] फळ सपक्ष व त्यात एकच बी असते.

सामान्यतः दाब कलमांनी किंवा डोळे भरून लागवड करतात, परंतु घंटाकृती काचपात्राखाली वाळूमध्ये कोवळे कलम लावून ते प्रथम वाढविता येते. मॅलॅगॅसीमध्ये सालीपासून धागे काढतात.

 

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate