অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काजळा

काजळा

काजळा

(फांगळी; लॅ.एजिसिरॅस मॅजूस; कुलमिर्सिनेसी). समुद्रकिनारी चिखलात वाढणारे हे झुडूप सु.दोन ते सहा मी. उंच वाढते. मुंबई कारवार, सुंदरबन, अंदमान बेटे व कराची ह्या ठिकाणी ते आढळते.

काजळाकाजळा

त्यात पांढरा चीक असतो. पाने मोठी, साधी एकांतरित (एकाआड एक), वरुन फिकट हिरवी व खालून निळसर, तळाकडे निमुळती, आखूड देठाची, टोकास खाचदार; फुलोरा चवरीसारखा असून त्यावर अनेक, लहान, पांढरी व सुवासिक फुले फेब्रुवारीत येतात.

फळ 2.5-7 सेंमी. लांब, लांबट, वाकडे, टोकदार, तळाशी पेल्यासारख्या संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरील मंडलाने, पुष्प्कोशाने) वेढलेले व पिंगट असते; बी एकच असून ते फळात रुजते व आदिमूळ (वनस्पतीच्या गर्भाच्या अक्षाचा खालचा भाग) बाहेर येते (अपत्यजनन). लाकूड लालसर, कठीण आणि किरकोळ उपयोगाचे असते.

साल कातडी कमाविण्यास उपयुक्त; सालीची पूड मत्स्यांना विषारी असते.

 

 

लेखक: भो.सुं. नवलकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate