অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कानवेल

कानवेल

कानवेल

(साकळवेल, करकंडीचा वेल; हिं. रायधानी; क.कुरियड्डी; लॅ. व्हेंटिलॅगो कॅलिक्युलेटा; कुल - ऱ्हॅम्नेसी). ही वेल [→ महालता] भारताच्या उष्ण भागातील पानझडी जंगलात सापडते. शिवाय कुमाऊँ, नेपाळ ते भुतान, सिल्हेट, जावा इ. ठिकाणीही तिचा प्रसार आहे.

पाने मध्यम आकाराची (५ - १३ x  २.५ - ७ सेमी.), दंतुर; कोवळी पाने विशेषत: खालून लवदार; फुलोरा परिमंजरीय वल्लरी [→ पुष्पबंध] व त्यावर दुर्गंधी, हिरवट, लहान व  असंख्य फुले; किंजपुट लोमश [→फूल]; फळ एकबीजी, सपक्ष, तळाशी संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरच्या मंडलाने) अर्धे वेढलेले, कपाली (शुष्क, कठीण व आपोआप न फुटणारे फळ) व त्यात एक कप्पा.

इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ऱ्हॅम्नेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे; साल व कोवळ्या प्ररोहांचा (कोंबांचा) रस हिवतापात होणाऱ्या अंगदुखीवर लावतात.

 

 

लेखक: रा ना जोशी

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate