অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कापसी

कापसी

कापसी

(कुरळ; हिं. संसागूरू; इं. वाइल्ड ऱ्हीया; लॅ. डेब्रेगेसिया व्हेल्यूटिना; कुल-अर्टिकेसी). हा ४.५ - ७.५ मी. उंच व ०.६ मी. घेराचा सदापर्णी, सरळ वृक्ष कोकण, कारवारचे जंगल, कुमाऊँ ते सिक्कीम, आसाम, खासी टेकड्या, निलगिरी, जावा, श्रीलंका, ब्रह्मदेश इ. ठिकाणी आढळतो.

पाने सोपपर्ण (उपपर्णांसह), साधी, एकाआड एक, ५-१८ x २.५ सेंमी., भाल्यासारखी, तीन प्रमुख शिरांची, पातळ, वरून खरबरीत, खालून लवदार, अंतर्वृंती (देठामधील) उपपर्ण; एकलिंगी फुले एकाच झाडावर (एकत्रलिंगी), कक्षास्थ (बगलेत), स्तबकावर किंवा गुच्छावर, क्वचित एकेकटी किंवा जोडीने [→ फूल] नोव्हेंबर-जानेवारीत येतात.

फळे नारिंगी पिवळी, खाद्य व लहान असून डिसेंबर-फेब्रुवारीत वापरतात. अंतर्सालीपासून बळकट धागे काढून त्यांपासून धनुष्याच्या दोऱ्या, सुतळी, दोर व कोळ्यांची जाळी बनवितात.

 

 

लेखक: वि. रा. ज्ञानसागर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate