অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कारंज-वृक्ष

कारंज-वृक्ष

कारंज-वृक्ष

(क. निरुकायी; इं.स्कार्लेट-बेल ट्री, फौंटन-ट्री, आफ्रिकन टुलिप-ट्री; लॅ. स्पॅथोडिया कॅंपॅन्युलेटा; कुल-बिग्नोनिएसी). हा सुंदर वृक्ष मूळचा पश्चिम आफ्रिकेतील असून उष्णकटिबंधात सर्वत्र, शोभेसाठी व सावलीकरिता रस्त्यांच्या दुतर्फा व उद्यानांतून लावलेला आढळतो.

पाने संयुक्त, पिसासारखी, विषमदली; दले ९–१९, संमुख (समोरासमोर), इंडाकृती व टोकदार असतात; फुले नारिंगी शेंदरी, मोठी, अग्रस्थ (शेंडयावरील) मंजऱ्यांवर डिसेंबर–मार्चमध्ये येतात.

संवर्त हिरवट तपकिरी,सच्छद, नावेसारखा व कलिकावस्थेत इतर भागांस पूर्णपणे झाकतो; पुष्पमुकुट घंटेसारखा; केसरदले पिवळी, चार, बहिरागत व लोंबते परागकोश; बिंब वाटीसारखे,किंजपुटात अनेक बीजके [ →फूल]; फळे (बोंडे) पिंगट, भाल्यासारखी, कठीण व अनेकबीजी; बीजे सपक्ष व लंबगोल. कळी दाबली असता पाणी पिचकारीप्रमाणे बाहेर येते म्हणून त्या अर्थाचे इंग्रजी आणि मराठी नाव पडले आहे. शास्त्रीय नाव संवर्त वा पुष्पमुकुट यांच्या स्वरुपावरुन दिले आहे.

यांचे लाकूड पांढरे, परम व सुतारकामास चांगले असते; नवीन लागवड बी किंवा मुळापासून येणाऱ्या अधश्चरांनी (जोरदार वाढणाऱ्या कोंबांनी) करतात.

 

 

लेखक: सुधारक देशपांडे

कारंज-वृक्ष


 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate