অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कारगोळ

कारगोळ

कारगोळ

(कापशी, रानआंबडा; हिं.बंदुमानू; क. कडु बाजा, बेंडकार्का, किरुहळळे; सं.जीवंती; इं.इंडियन नेटल ट्री, चारकोल ट्री; लॅ.ट्रेमा ओरिएंटॅलीस; कुल-उल्मेसी).

हा अल्पायुषी पण जलद वाढणारा, सदापर्णी, ७·५–९ मी.उंच व ०·५–०·९ मी. घेराचा वृक्ष, सामान्यतः भारतात सर्वत्र आढळणारा (विशेषतः उत्तर कारवारात व कोकणात) असून त्याची साल करडी, केशहीन व वल्करंध्रयुक्त (परित्वचेतील सूक्ष्म छिद्रयुक्त) असते.

कोवळया फांद्या लवदार; पाने लंबवर्तुळाकृती, एकाआड एक, तळास असमान, दंतुर, तीन मुख्य शिरांची, साधारण खरबरीत, खालून पांढुरकी; फुले हिरवट, अवृंत (बिनदेठाची), एकलिंगी, बहुयुतिक व कक्षास्थ (बगलेतील) वल्लरीवर वर्षभर येतात [→फूल] ; फळ अश्मगर्भी (आठळीयुक्त), फार लहान, गोलाकार, काळे, खाद्य व एकबीजी असते. लाकूड फिकट तपकिरी असून तोफेच्या दारुचा कोळसा करण्यास उपयुक्त.

अंतर्सालीपासून उत्तम बळकट धागा मिळतो; हे झाड सावलीकरिता उत्तम; जंगलातील साफ केलेल्या जागेवर पुन्हा वाढण्यास ह्याचा क्रमांक पहिला असतो. अपस्मारावर उपयुक्त. लाकडाचा लगदा कागदनिर्मितीत वापरतात.

 

लेखक: वि. रा. ज्ञानसागर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate