অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कारीट

कारीट

कारीट

(टकमकी; हिं.जंगली इंद्रायण, हिंसलांबी; गु.कोठीबान; सं. विशाला; लॅ.कुकुमिस ट्रायगोनस कुल-कुकर्बिटेसी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) वेल भारतात सर्वत्र सापडते. शिवाय श्रीलंका, मलाया, उत्तर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व इराण येथेही आढळते. पाने हस्ताकृती विभागलेली; खंड पाच ते सात; लहान,एकलिंगी पिवळी फुले एकाच वेलीवर जून ते सप्टेंबरात येतात; मृदुफळे लांबट, वाटोळी, फिकट पिवळी व त्यावर दहा हिरव्या उभ्या रेषा असतात;

बिया पांढऱ्या आणि लंबवर्तुळाकृती. इतर सामान्य लक्षणे कुकर्बिटेसी कुलाच्या वर्णनाप्रमाणे. फळातील मगज (गर) गर्भपातक, कडू व तीव्र रेचक; बिया थंड, पित्तशामक व स्तंभक (आकुंचन करणाऱ्या); मुळांचा काढा सौम्य रेचक; मलबारमध्ये फळ वेडसरपणावर, स्मरणशक्ती वाढविण्यास आणि चक्कर न येण्याकरिता वापरतात. बियांचे तेल जळणासाठी उपयुक्त असते.

 

लेखक: व. ग. क्षीरसागर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate