অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कासूद

कासूद

कासूद

(काशिंदा; इं. सयामीज कॅसिया, जूवार; लॅ. कॅसिया सयामिया; कुल-लेग्युमिनोजी, सीसॅल्पिनिऑइडी). रस्त्यांच्या दुतर्फा व बागेतून शोभेकरिता व सामान्यपणे सावलीकरिता लावण्यात येणारा हा जाडजूड, जलद वाढणारा, पण मध्य आकाराचा व ९-१८ मी. उंच शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष श्रीलंका, ब्रह्मदेश, मलेशिया, थायलंड,भारत (फक्त दक्षिणेत) इ.देशांत निसर्गतः आढळतो; महाराष्ट्रात फक्त लागवडीत दिसतो. याची सामान्य शरीरिक लक्षणे बाहवा, तरवड व टाकळा यांसारखी आहेत [लेग्युमिनोजी] .

साल करडी, गुळगुळीत, काहीशी भेगाळ; पाने संयुक्त, पिसासारखी व १५-३० सेंमी. लांब; दले ६-१४ जोड्या, फांद्यांच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत,सप्टेंबर-एप्रिलमध्ये परिमंजऱ्यांवर पिवळी फुले येतात. शेंग सु.३० सेंमी. लांब, सरळ, पिंगट, अरुंद, चपटी व अनेकबीजी असते. बिया पिंगट व गुळगुळीत. केसरदले (पुंकेसर) भिन्न लांबीची व काही वंध्य असतात [फूल] .

लाकूड कठीण, जड, टिकाऊ, मजबूत व काळपट असल्याने त्याच्यापासून सजावटी सामान, कपाटे, हातातील काठया, खांब, तुळया, हत्यारांचे दांडे, ठोकणी इ. वस्तू बनवितात. साल व शेंगांपासून टूनीन मिळते, फुले भाजीकरिता आणि पाने खताकरिता उपयुक्त असून झाड लाखेचे किडे वाढविण्यास उपयुक्त आहे.

 

 

लेखक: शं. आ. परांडेकर

 

 

 

 

 

 

कासूद : (१) पान,(२) फूल, (३) शिंवा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate