অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कासूद, ब्रह्मी

कासूद, ब्रह्मी

कासूदरह्मी

(इं.बर्मीज पिंक कॅसिया; लॅ. कॅसिया रेनिजेरा कुल-लेग्युमिनोजी, सीसॅल्पिनिऑइडी). सुंदर फुलोऱ्याकरिता बागेत व रस्त्यांच्या दुतर्फा लावण्यास उपयोगात असलेला हा लहान, डौलदार, शिंबावंत (शेंगा येणारा) व पानझडी वृक्ष वाहवा, तरवड, कासूद इत्यादींच्या वंशातील असल्याने ह्याचे अनेक शारीरिक लक्षणांत त्यांच्याशी साम्य दिसून येते.

१९०२ मध्ये रंगूनहून याचा प्रथम मुंबईत प्रवेश झाला व त्यानंतर तो भारतात इतरत्र व मलेशियात पसरला. तो मूळचा उत्तर ब्रह्मदेशातील रुक्ष जंगलातील आहे.

याची उंची ५.५० ते ६.४० मी. असते. पाने संयुक्त आणि पिसासारखी, १०.३० सेंमी. लांब; उपपर्णे मूत्रपिंडाकृती (यावरुन जातिवाचक लॅटिन नाव पडले);दले ८-२० जोड्या, दल मऊ व लंबगोल असते [पान] . पाने डिसेंबर-मार्चमध्ये झडतात. एप्रिलनंतर कळ्यांना सुरुवात होऊन प्रथम लालसर, आकर्षक गुलाबी फुले व नंतर पाने मे ते जुलैपर्यंत येत असतात.

फुले मोठी व पडलेल्या पानांच्या ब्रणाजवळ झुबक्यांनी येतात. जून फुले पांढरट होतात. दहा केसरदले (पुंकेसर) भिन्न लांबींची असून सर्वांत लांब अशा तिन्हींचे तंतू मध्यभागी फुगीर असतात. शेंग बाहव्याप्रमाणे ३०-६० सेंमी. लांब असते. हा वृक्ष फार शेभिवंत, जलद वाढणारा आणि फुलणारा असल्याने विशेषेकरून शोभेकरिता उपयोगात आहे. नवीन उत्पत्ती बियांनीच होते.

 

 

लेखक: शं. आ. परांडेकर

ब्रह्मी कासूद :(१) फांदी,(२) फुलोरा,(३) फूल, (४) शिंवा,(५) बी.

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate