অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किरमाणी ओवा

किरमाणी ओवा

(हिं. किरमाला; सं. गंधा; इं. सँटोनिका, वर्मसीड; लॅ. आर्टेमिसिया मॅरिटिमा; कुल-कंपॉझिटी). ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी), केसाळ ओषधी  [ओषधि] इंग्‍लंड ते मंगोलिया, पश्चिम हिमालय, तिबेट, बलुचिस्तान इ. प्रदेशांमध्ये आढळते. खोड १५—४५ सेंमी. उंच पण कधी थोडेफार आडवे वाढते. पाने पाच सेंमी. लांब, बहुधा पांढरट, लंबगोल, संयुक्त व पिसासारखी;  फुले लहान, थोडी, लालसर व स्तबके आखूड कणिशावर येतात [कंपॉझिटी]. फुलातून सँटोनीन नावाचे जंतनाशक द्रव्य मिळते, ते रेचक व दीपक (भूक वाढविणारे) आहे. सूज व जखमांवर वनस्पतीचा शेक देतात. यावरून इंग्रजी नाव सार्थ आहे.

आर्टेमिसिया सिना : (इं. लेवांट वर्मसीड प्लँट). ही त्याच वंशातील ओषधी सँटोनीन द्रव्याबद्दल शेकडो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. ती  पश्चिम आशियाकडील  (इराण व तुर्कस्तान)  असून यूरोपमध्ये  तिचा प्रसार प्रथम धर्मगुरूंनी केला. हिची फुले पिवळट असतात. रशियात व प. अमेरिकेत तिची लागवड केली जाते.

लेखिका :  पुष्पलता द. आफळे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate