অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

किराईत

किराईत

किराईत

(काडेचिराईत हिं. चिरायत, चिरेता; क. नेलबेवू; गु. करियातू; सं. चिरतित्क, भूनिंब; इं. चिरेता; लॅ. स्वर्शिया चिराता; कुल-जेन्शिएनेसी). ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) औषधी सु १.५ मी. उंच असून समशीतोष्ण हिमालयात १,२००-३,००० मी. उंचीवर, काश्मीर ते आसामपर्यंत आढळते.

पाने समोरासमोर, साधी, बिनदेठाची, खालची अधिक मोठी व कधी देठाची; परिमंजरी मोठी, शाखित व पर्णयुक्त; फुले लहान, फिकट हिरवी व त्यांवर जांभळी छटा; प्रत्येक पाकळीच्या तळाशी हिरवट प्रपिंडांची (ग्रंथींची) जोडी आणि तीवर पांढरे किंवा लालसर लांब केस. केसरदले ४-६, पाकळयांच्या तळाशी चिकटलेले; किंजपुटात एकच कप्पा [à फूल, ] बोंड लहान, ०.६ मिमी., लंबगोल आणि टोकदार असून फुटून त्याची दोन शकले होतात.बिया अनेक व सूक्ष्म असतात.

फुले आली असताना ही वनस्पती जमा करून वाळवितात व औषधात वापरतात.  ती कडू, दीपक (भूक वाढविणारी), ज्वरनाशक, सारक, पौष्टिक व कृमिनाशक आहे.  अतिसार, दुर्बलता, ताप इत्यादींवर ती देतात.  जीर्ण विषमज्वरात व आमाशयाच्या शिथिलतेत किराईत उपयुक्त असते.

किराइताच्या वंशातील अनेक जाती डोंगराळ भागात आढळतात; त्यांचा उपयोग किराइताप्रमाणे करतात.  भारतात दरवर्षी सु. ४०० क्विंटल किराइताचा वापर करतात.

 

लेखक: परांडेकर, शं. आ.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/23/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate