অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुंदा

कुंदा

कुंदा

(कारी गु. खावो; क. कणिग्यन हुळ्ळू; लॅ. इशिमम पायलोजम कुल-ग्रॅमिनी). हे वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणारे) ०.६ ते १. ५ मी. उंचीचे गवत आहे.

मुळे जमिनीत खोल जातात; अधश्चरांचे (ठोंबांचे) दाट जाळे जमिनीच्या मशागतीस अडथळे आणते. उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत या गवताचा प्रसार सामान्य असून भारतात आंध्र, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात सोलापूर व अहमदनगर जिल्हे येथे आढळते. सुपीक, काळ्या जमिनीत ते खूप वाढते.

फुले मार्च—ऑक्टोबर मध्ये येतात व ती येण्यापूर्वी जनावरास चारण्यास चांगले; तथापि त्यांना ते साधारणच आवडते. प्रायोगिक क्षेत्रात या गवताचे हेक्टरी सु. १,०९० किग्रॅ. उत्पादन करण्यात आलेले आहे. ते वाळवूनही वापरतात.

 

 

लेखक: चौगले, द. सी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate