অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॅक्टेसी

कॅक्टेसी

कॅक्टेसी

(नागफणा कुल; कंथारी कुल). फुलझाडांपैकी (द्विदलिकित वर्गातील) कॅक्टेलीझ ह्याप्रारंभिक गणातील एकमेव कुलाचे नाव. या कुलाचे ⇨निंफिएसी कुलाशी जवळचे नाते आहे. ह्याकुलामध्ये विलिस यांच्या मताप्रमाणे एकूण सु. ५०-१५० वंश व २,००० जाती असून बहुतेक सर्वअमेरिकेतील (विशेषत: मेक्सिको, ब्राझील) आणि काही इतर खंडांतील रुक्ष प्रदेशांत आढळतात.

त्याबहुतेक सर्व मांसल व काटेरी ओषधी [→ ओषधि], क्षुपे (झुडपे), क्वचित वेली व वृक्षही आहेत. काहीअपिवनस्पती (दुसऱ्या वनस्पतींच्या पानांच्या देठांचा आधार घेणाऱ्या पण त्यांच्यावर उपजीविका न करणाऱ्या वनस्पती) आहेत (उदा., ऱ्हिप्सॅलीस, एपिफायलम व फायलोकॅक्टस).

खोड फार लहान किंवा ते २० मी. उंचीपर्यंत मोठे (उदा., सेरियस जायगँशियस), हिरवे, सपाट किंवाकोनीय, धारायुक्त किंवा दंडाकृती असते; पाने साधी, एका आडएक, मांसल (उदा., पेरेस्किया) अथवा खवल्यासारखी असूनकधी ती मुळीच नसतात [पर्णकांड, → खोड].

खोडावर अनेकदालहान उंचवट्यांवर राठ केस व पानांचे रूपांतरीत काटे असतात.फुले अवृंत (बिनदेठाची), द्विलिंगी, अपिकिंज, अरसमात्र, मोठी, बहुधा एकेकटी किंवा फुलोऱ्यात (परिमंजरी, कणिश) येतात.नलिकाकृती पुष्पासनावर सर्पिल, सारखी, असंख्य व सुटीपरिदले असून संदलांतून प्रदलांकडे संक्रमण आढळते व बहुधासुंदर रंगसंगतीही दिसते. केसरदले असंख्य  व  सर्पिल आणि केसरतंतू विविध; किंजदले अनेक जुळलेली; किंजपुट अध:स्थ, बीजके अनेक वतटलग्न [→ फूल]; मृदुफळ क्वचित शुष्क, काटेरी व अनेकबीजी; बियांवर पंख किंवा सूक्ष्म खाचा असतात.

आ . १. सेरियस जायगँशियस : (अ) फक्त शेंड्याकडील भाग, (आ) फूल.आ . १. सेरियस जायगँशियस : (अ) फक्त शेंड्याकडील भाग, (आ) फूल. आ. २. ऱ्हिस्पॅलीस कॅसिया : (अ)आ. २. ऱ्हिस्पॅलीस कॅसिया : (अ)

खोडांच्या आकार वैचित्र्याने व सुंदर फुलांमुळे अनेक  जाती शोभे करिता लावतात. काहींची फळे खाद्य व  काहींची खोडे, फुले आणि फळे औषधी आहेत. मोठ्या  जाती. (उदा., सेरियस ग्रँडिफ्लोरस) कुंपणाकरिता लावतात.⇨निवडुंग व ⇨नागफणा या जाती भारतात सामान्यपणे आढळतात.

ज्या कोचिनीयल किड्यांपासून तांबडा रंग मिळतो, त्यांचे भक्ष्य असलेला निवडुंग (नोपालिया कॉक्सिनेलिफेरा) उष्णकटिबंधातील देशांत लागवडीत आहे. भारतात याची लागवड  यशस्वी झालेली नाही; तथापि बागेत लावलेला कोठे कोठे आढळतो. सेरियस, सेलेनिसेरियस, पेरेस्किया, र्‍हिप्सॅलीस, एपिफायलम इ. वंशांतील जाती बागेत शोभेकरिता लावतात.

आ. ३. पेरेस्किया अॅक्युलिअॅटा : (अ) फुलासह फांदी, (आ) फळआ. ३. पेरेस्किया अॅक्युलिअॅटा : (अ) फुलासह फांदी, (आ) फळ

लेखक: शं. आ. परांडेकर

ऑपन्शिया मॅमिलेटा मॅमिलॅरिया जाती सेरियस जाती
ऑपन्शिबा मायक्रोडेमिन (मेक्सिको) जिम्नोकॅलिमियम मिहानोव्हिवाय : रेडिकॅप (यूरग्वाय). सेरिबस जाती

रेब्युशिया सेनिलिस : कलमी (ग्राफ्टेड) कॅक्टस (अर्जेंटिना)

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate