অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केप हनिसकल

केप हनिसकल

केप हनिसकल

(लॅ. टेकोमा कॅपेंसिस कुल-बिग्नोनिएसी). मूळची दक्षिण आफ्रिकेतील पण हल्ली सर्वत्र शोभेकरिता बागेतून लावलेली झुडूपवजा वेल. पाने संमुख (समोरासमोर), संयुक्त व विषमदली; दले ७—९, दंतुर, अंडाकृती.

नारिंगी किंवा शेंदरी लाल फुलांच्या मंजऱ्या सप्टेंबर—ऑक्टोबरात फांद्यांच्या टोकांस येतात; संवर्त पेल्यासारखा व संदले पाच; पुष्पमुकुट खाली नळीसारखा पण टोकास पसरट व किंचित वाकडा; पाकळ्या चार व त्यांपैकी एक मोठी; केसरदले चार व दीर्घद्वयी; एक वंध्य केसर; खोलगट बिंबावर किंजपुट असून बोंड अनेकबीजी व तडकणारे असते [→ फूल].

व्यवस्थितपणे छाटणी करून ही वेल सरळ झुडुपाप्रमाणे वाढविता येते किंवा घराच्या दर्शनी भिंतीवर चढवून घराचे सौंदर्य वाढविता येते. हलकी, सकस व चांगली निचऱ्याची जमीन या वेलीला मानवते; भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. छाट कलमे लावून नवीन लागवड करतात. अनुकूल परिस्थितीत वर्षभर फुले येतात.

 

लेखक: देशपांडे, सुधाकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/14/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate