অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॉटनग्रास

कॉटनग्रास

कॉटनग्रास

(एरिओफोरम). लव्हाळा, मोथा, कचेरा इ. एकदलिकित वनस्पतींच्या कुलातील [ →सायपेरेसी] ही ⇨औषधी एरिओफोरम या वंशातील असून इंग्रजी नावाने सुचविले असले तरी हे गवत नव्हे. ह्या वंशातील सु. २० जाती यूरोप, आशिया व उ. अमेरिका येथील समशीतोष्ण प्रदेशात शीतकटिबंधात, पण बहुधा दलदलीच्या ठिकाणी आढळतात.

एक जाती आफ्रिकेत आढळते. ह्या औषधीय, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) व झुबक्यासारख्या असून फुले द्विलिंगी असतात. ती लोंबती असतात [→पुष्पबंध].

परिदले लांब केसासारखी व फळास चिकटून राहतात व त्यांच्या प्रसारास मदत करतात. या मऊ, लांब व रेशमी केसांचा उपयोग उशा, गिरद्या वगैरे भरण्यास व कागदनिर्मितीत करतात. हिमालयातील एका जातीच्या (ए. कोमोजम) केसांचा उपयोग भाबर गवताबरोबर मिसळून दोर करण्यास होतो.

कॉटन ग्रास: (१) एरिओफोरम अंगुस्तिफोलियम : (अ)फलधारी प्ररोह, (आ)फूल, (२) एरिओफोरम पॉलिस्टॉकिऑनाचा फुलोरा.

अलास्कात ए. कॅलिथ्रिक्स ही जाती रेनडियर प्राण्यास उन्हाळ्यात खाण्यास उपयोगी पडते. या वनस्पतीची इंग्रजी व शास्त्रीय नावे या लोकरीसारख्या केसांवरूनच आहे.

 

लेखक: शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate