অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी

कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी

कॉन्व्हॉल्व्ह्युलेसी

(हरिणपदी कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) सोलॅनेलीझ या गणातील हे एक कुल असून सु. ५० वंश व १,१०० जाती यात समाविष्ट आहेत. त्यांचा प्रसार जगातील उष्ण व समशीतोष्ण भागांत आहे. एक दोन अपवाद (उदा., क्रेसा वंश) सोडल्यास बहुधा सर्वच वेली आहेत;

त्यांना दुधी चीक असतो. पाने साधी, एकाआड एक; फुले द्विलिंगी, नियमित, बहुधा मोठी, आकर्षक, कधी छदमंडलित व कीटक परागित (कीटकांद्वारे परागसिंचन झालेली). संदले पाच, बहुधा सुटी व सतत राहणारी; पुष्पमुकुट पाच सलग पाकळ्यांचा व घंटाकृती किंवा नसराळ्यासारखा, पुष्पदलसंबंध परिवलित; केसरदले पाकळ्यांवर आधारलेली व पाच, किंजदले दोन, जुळलेली;, किंजपुट ऊर्ध्वस्थ बहुधा दोन कप्प्यांचा, वलयाकृती बिंबाने वेढलेला; बीजके एक ते चार, अधोमुखी [ →फूल]; फळ मृदू अथवा शुष्क (बोंड), बिया क्वचित केसाळ व अपुष्क (वाढणाऱ्या बीजाला पोषणद्रव्ये पुरविणारा पेशीसमूह नसलेल्या).

बोरॅनिजेसी, सोलॅनेसी इ. कुलांशी या कुलाचे साम्य व आप्तभाव आहे. याला ‘गंधवेलादि कुल’ असेही म्हणतात. गारवेल, कामलता, समुद्रशोक, निळवेल या शोभेकरिता; रताळे, भुईकोहळा, नावळी इ. खाण्याकरिता; निशोत्तर, उंदीरकानी, मर्यादवेल इ. औषधाकरिता वापरतात. अमरवेल उपद्रवकारक असते.

 

 

लेखक: केळकर, शकुंतला

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate