অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोटोनिअ‍ॅस्टर

कोटोनिअ‍ॅस्टर

कोटोनिअ‍ॅस्टर-(कुल-रोझेसी). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) एका वंशाचे लॅटिन नाव. यामध्ये सु. ५० जातींचा समावेश असून त्यांचा प्रसार उ. समशीतोष्ण प्रदेशात (यूरोप, आशिया व उ.आफ्रिका) आहे.

भारतात पूर्व समशीतोष्ण हिमालयात (सु. १,२४० - २,४८० मी. उंचीपर्यंत) पंचमढी व काश्मीर ते नेपाळमध्ये को. बॅसिलॅरिस व को अ‍ॅक्युमिनेटा (हिं.रिऊ) या जाती आढळतात.

कोटोनिअ‍ॅस्टर वंशातील सर्वच जाती क्षुपे (झुडपे) किंवा लहान वृक्ष आहेत. कित्येक बागांतून शोभेकरिता लावतात कारण त्यांच्या पानांचे शरद ऋतूतील भडक रंग व लाल किंवा काळी फळे आकर्षक असतात.पाने एकाआड एक, अखंड व सोपपर्ण (उपपर्णयुक्त) फुले पांढरी किंवा लालसर, एकेकटी किंवा वल्लरीवर येतात. सामान्य संरचना रोझेलीझ गणात वर्णिल्याप्रमाणे. इंडोचायनात को. बॅसिलॅरिसाचे तिरश्चर (मुनवे) स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारे) म्हणून देतात. को.अ‍ॅक्युमिनेटाच्या लाकडापासून हातात धरावयाच्या काठ्या बनवितात .

 

 

लेखक: जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate