অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोडियम

कोडियम

(इ.क्रोटॉन; लॅ.कोडियम व्हॅरिगेटम कुल –यूफोर्बिएसी). या नावाने ओळखली जाणारी, विविध प्रकारची पाने असलेली झाडे बागेत नेहमी लावलेली आढळतात. मूळची ती मोल्यूका बेटातील आहेत.ती सदापर्णी, काटक व सु. २ – ४ मी. उंच व चिकाळ असतात. पाने साधी , एकांतरित (एकाआड एक), जाडसर, चिवट, भिन्न आकारांची असून त्यांवर अनेक रंगीत ठिपके असतात.फुले एकलिंगी, लहान, हिरवट, पिवळसर असून ती कक्षास्थ (बगलेतील) मजंऱ्यांवर येतात [यूफोर्बिएसी]. लहानमोठ्या सार्वजनिक बागांत अथवा बंगल्यात लावण्याकरिता ही झाडे लोकप्रिय झाली आहेत.

फुलदाणीत बरेच दिवस टिकतात फांदीला मुळेही फुटतात व त्यांनंतर बागेत किंवा कुंडीत लावल्यास नवीन झाड वाढते. या झाडांचे सु. ३० प्रकार उपलब्ध आहेत.


कोडियम : कोडियम व्हॅरिगेटमचे विविध प्रकार

 

 

 

 

 

 

 

लेखक: पटवर्धन, शां. द.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate