অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कौरची

कौरची

कौरची

(दंडुस; हिं. बिथुआ, टाकोळी; क. हराणी; गु. गेंग्री; लॅ. डाल्बर्जिया लँसेओलॅरिया ; कुल-लेग्युमिनोजी). शिसू व शिसवी यांच्याच वंशातील पण भिन्न जातीचा हा लहान पानझडी वृक्ष आहे. याचा प्रसार सर्व भारतात (सह्याद्री व कारवारची जंगले, खानदेश व क्वचित कोकण), श्रीलंकेत व पाकिस्तानमध्ये आहे.

हा सु. ९—१२ मी. पर्यंत व क्वचित अधिक उंच वाढतो;खोडाचा घेर १·२—१·५ मी., साल करड्या रंगाची व संयुक्त विषमदली पाने शिसूपेक्षा थोडी लांब (७·५—१·५ सेंमी.) असून ११—१५ दले मात्र लहान असतात. फुलोरा फांदीच्या टोकास किंवा पानांच्या बगलेत असून त्यावर मार्च ते मेमध्ये शिसूपेक्षा थोडी मोठी व फिकट निळी फुले येतात;फुलांची संरचना पतंगरूप [→ अगस्ता]व इतर लक्षणे शिसूप्रमाणे.

केसरदलांचे प्रत्येकी पाचाचे असे दोन जुडगे असतात [→ फूल];शिंबेमध्ये (शेंगेमध्ये) एकच बी असल्यास ती ४–५ सेंमी. व दोन बिया असल्यास कधीकधी १० सेंमी. लांब व २·६ सेंमी. रुंद असते. ती तपकिरी, लवचिक व दोन्हीकडे टोकदार असते. याचे पांढरे, मजबूत व कठीण लाकूड घरबांधणीत वगैरे उपयोगाचे आहे.

सालीत १४ टक्के टॅनीन असते. सालीचा फांट (काढा) अग्निमांद्यावर (भूक मंदावण्यावर) पोटात घेण्यास देतात;ती पाळीच्या तापावर उपयुक्त असून बियांचे तेल संधिवातावर गुणकारी असते.

 

 

लेखक: शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate