অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

क्लार्किया

क्लार्किया

क्लार्किया

फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) ऑनेग्रेसी (शृंगाटक-शिंगाडा कुल) कुलातील एक वंश. यामध्ये सु. ३६ जातींचा समावेश असून त्यांचा प्रसार उ. अमेरिकेतील प. भागात आहे. इतरत्र बागेत

क्लार्किया पल्चेला

शोभेकरिता लावल्या जातात. अमेरिकेतील रॉकी पर्वत व त्या पलीकडचा प्रदेश याचे संशोधक लेविस यांचे सहकारी क्लार्क यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या वंशाला दिले आहे.

या वनस्पती काटक, वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) व सुंदर ⇨ ओषधी असून लागवडीस सोप्या आहेत. गरम हलक्या जमिनीत, उन्हात किंवा काहीशा सावलीत त्या चांगल्या वाढतात. पाने साधी, एकाआड एक, बहुधा अखंड क्कचित दातेरी; फुले नियमित, दिखाऊ, विविधरंगी, वरच्या पानाच्या बगलेत एकेकटी किंवा शेंड्यावर मंजरीत येतात.

संवर्त नळीसारखा असून पाकळ्या चार, तळाशी अरुंद अखंड किंवा खंडित व खूप पसरट असतात.

केसरदले आठ व त्यांपैकी निम्मी अविकसित, आखूड व इतरांशी एकाआड एक; किंजल्क चार, मोठे व पसरट [→ फूल]; बोंड लांबट, रेषाकृती व चौधारी. बागेत वाफ्यांमध्ये साधारण २० सेंमी. अंतरावर लावण्यात आणि फुलदाणीत ठेवण्यास या जाती चांगल्या असतात. लागवडीत असल्याने क्लार्कियाच्या जातींत बरीच सुधारणा झाली आहे.

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate