অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खरसिंग

खरसिंग

खरसिंग

(कडशिंग; हिं. बेरशिंग; क. हूडे, हुळवे; लॅ. स्टेरिओस्पर्मम झायलोर्कापम; कुल-बिग्नोनिएसी). हा मध्यम उंचीचा (९ - १०.५) पानझडी वृक्ष ⇨ पाडळ व ⇨परळ यांच्या वंशातील आणि ⇨ बिग्नोनिएसी कुलातील असून याची अनेक लक्षणे तेथे वर्णिल्याप्रमाणे आहेत. भारतात (कोकण, डांग, खानदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील घाट, धारवाड, सातपुडा जंगल इ.) सामान्यपणे आढळतो.

साल फिकट करडी; पाने मोठी, संयुक्त व पिसासारखी; दले ५ - ९, पुनश्च विभागलेली; सुवासिक व पिवळट पांढरी फुले अग्रस्थ (शेंड्यावरील) परिमंजऱ्यांवर एप्रिल-मेमध्ये येतात. पुष्पमुकुट नसराळ्यासारखा, ५ सेंमी. लांब; बोंड कठीण, वाकडे, खरबरीत, गोलसर व फुटीर असून त्याची दोन शकले होतात. बीजे पंखयुक्त असतात. याचे लाकूड चांगले, बळकट व चिवट असून कपाटे, कातीव काम, खांब इत्यादींकरिता उपयुक्त असते. लाकडातील तेल चर्मरोगांवर लावण्यास चांगले.

 

लेखक: सुधाकर देशपांडे

स्त्रोत:मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/26/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate