অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खाजकुइली

खाजकुइली

खाजकुइली

(कवच, खाजकुइरी; हिं. गोंचा; गु. किंवच; क. कडवरे, हसगुणी; सं. तीक्ष्णा, वनारी,

खाजकुइली : (१) संयुक्त पान, (२) फुलोरा, (३) शिंबा

आत्मगुप्ता; इं. कौहेज, कोविच, हॉर्सआय बीन; लॅ. म्युक्यूना  प्रूरिएन्स कुललेग्युमिनोजी). जंगलात व शेताकडेने कुंपणावर पसरणारी ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) वेल पाकिस्तानात व भारतात स‌र्वत्र सामान्यपणे आढळते. उष्ण कटिबंधातील इतर प्रदेशांतही तिचा प्रसार असून क्वचित कोठे लागवडीत आहे.

शारीरिक लक्षणे स‌र्वसाधारणत: ⇨ लेग्युमिनोजी कुलात (व त्यातील पॅपिलिऑनेटी या उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे. पाने संयुक्त, त्रिदली; दलांची खालची बाजू लवदार; नोव्हेंबरात लोंबत्या मंजऱ्यांवर पतंगरूप [→ अगस्ता], गडद जांभळी, मध्यम आकाराची फुले येतात. शिंबा (शेंग) दोन्ही टोकांस वाकलेली (५ - ७.५ X १.२ सेंमी.), गोलसर असून तीवर फिकट पिंगे किंवा करडे, राठ, कंडूत्पादक (खाज आणणारे) केस असतात; बिया ५ - ६ व लहान. नावाप्रमाणे भयंकर खाज उठविणारे केस हेच या वेलीचे वैशिष्ट्ये आहे.

मुळाचा काढा जलोदरात मूत्रल (लघवी साफ करणारा) म्हणून देतात व मुळाचा लेप बाहेरून लावतात; हस्तिपाद रोगावर त्याचे मलम उपयुक्त; दाहक केस कृमिनाशक; बियांची पूड पांढरी धुपणी (श्वेतप्रदर) व शीघ्र वीर्यस्खलन यांवर गुणकारी असते.

 

लेखक: शं. आ. परांडेकर

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate