অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुलगा

गुलगा

गुलगा

(गोलपत्ता; गु. परदेशी ताडियो; इं. वॉटर कोकोनट, निपापाम; लॅ. निपा फ्रुटिकँस; कुल-पामी). या लहान क्षुपाचा (झुडपाचा) प्रसार भारत (सुंदरबन), श्रीलंका, मलाया ते क्वीन्सलँडपर्यंत व ब्रह्मदेश इ. देशांत खाऱ्या दलदलीत आहे. खोड भूमिगत असून त्यापासून ४–६ मी. पर्यंत लांबीची उभी व मोठ्या पिसासारखी पुष्कळ अपूर्ण संयुक्त पाने येतात. फुलोरा १–२ मी. लांब असून खोडापासून स्वतंत्रपणे वर वाढतो व त्यावर टोकास स्त्री-पुष्पे व खालील बाजूस पुं-पुष्पे येतात. फुले एकलिंगी व फार लहान; फळ अंदाजे मनुष्याच्या डोक्याएवढे असून त्यात अनेक १०–१५ सेंमी. लांबीचे एकबीजी भाग असतात. पक्व बिया कठीण व अंड्याएवढ्या. फुलोऱ्यापासून गोड रस काढतात व त्यापासून शिर्का (व्हिनेगर), मद्य, गूळ व साखर मलायात व फिलिपीन्समध्ये बनवितात. खोबरे कठीण पण खाद्य. एका हेक्टरातून सु. ३४ क्विंटल साखर मिळते. पानांचा घरांच्या छप्परावर घालण्यास, टोपल्या, केरसुण्या, चटया व विड्या बनविण्यास उपयोग करतात. ही पाने कुटून शतपादप्राण्यांच्या (गोमेच्या) दंशावर लावल्यास गुणकारी असतात. कोवळ्या खोडावरील कळ्या, कोवळे फुलोऱ्याचे दांडे व अपक्व बिया कच्च्या वा शिजवून खातात. पाने व मुळे जाळून मिळालेली राख दातदुखीवर उपयुक्त असते. पानांचा उपयोग कातडी कमाविण्यास होतो.

 

पहा : पामी.

नवलकर, भो. सुं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/17/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate