অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोविंदफळ

गोविंदफळ

गोविंदफळ

(वागाटी; लॅ. कॅपॅरिस झेलॅनिका; कुल-कॅपॅरिडेसी). भारतात कोकण, पश्चिम घाट, दख्खन इ. प्रदेशांत विशेषकरून आढळणारे हे अनेक शाखायुक्त ताठर झुडूप आहे. पाने साधी, चिवट, लांबट, चकचकीत असून उपपर्णी काटे सरळ व आखूड असतात. फूले पांढरी व पानांच्या बगलेत, एकटी किंवा एका दांड्यावर २-३, फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये येतात. वरच्या दोन पाकळ्यांवर तळाजवळ रंगीत ठिपका असतो. किंजधर लहान [ → फूल]. फळ लंबगोल, लहान लिंबाएवढे, गर्द शेंदरी व साधारण टोकदार असते.

त्यातील पांढऱ्या मगजात (गरात) अनेक बिया बुडलेल्या असतात. सामान्य शारीरिक लक्षणे ⇨कॅपॅरिडेसी कुलात वर्णन केल्याप्रमाणे. याच्या फळांची भाजी आषाढ शुद्ध द्वादशीला खाणे हिंदू लोकांत पवित्र मानतात. मुळाची साल व पाने औषधी आहेत. साल कडू असून शामक, दीपक (भूक वाढविणारी) आणि पित्तशामक असते. पानांचे पोटीस गळवे, सूज, मूळव्याध इत्यादींवर गुणकारी असते.

 

लेखक: घवघवे, ब. ग.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate