অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चिवरी

चिवरी

चिवरी

(मेस; क. कोंडा; इं. स्लेंडर बांबू; लॅ. ऑक्सिटेनँथेरा स्टॉक्साय, कुल-ग्रॅमिनी). ऑक्सिटेनँथेरा वंशातील एकूण पाच जाती भारतात आढळतात. हा लहान, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारा), बारीक व ९ मी. उंच (व ३·८ सेंमी. घेर) वृक्ष (गवत) कठीण असून द. आशियात व द. भारतात (कोकण व उ. कारवार) विशेषतः समुद्रकिनारी आढळतो. याची लागवडही बरीच करतात (पाचगणी, किनाऱ्यावरची खेडी इ. भागांत) खोडावर पेरी आणि कांडी (१५-३० X २·५-४ सेंमी.) स्पष्ट दिसतात [→ कळक] व आतील पोकळी लहान असते.

पाने साधी १०-२० X ०·९-१·८ सेंमी. व साधारणपणे कळकासारखी, परिमंजरी मोठी आणि तीवर अनेक २·५ सेंमी. व्यासाची कणिश-गुच्छे असून त्यांत काटेरी कणिशके असतात [→फळ ]; गुच्छांना गोलसर छदे (फुलोऱ्याच्या तळाशी असलेली उपांगे) असतात; फुले नोव्हेंबरात येतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ग्रॅमिनी अथवा तृण कुलात वर्णिल्याप्रमाणे. खोडांचा उपयोग लाठ्या, काठ्या, छपरे, दांड्या, छत्र्यांचे दांडे, टोपल्या इत्यादींकरिता बराच होतो. बिया पेरून अथवा तळाजवळच्या कोंबांपासून नवीन लागवड करतात.

 

 

 

लेखक: ठोंबरे, म. वा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate