অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलवनस्पति

जलवनस्पति

जलवनस्पति

(लॅ. हायड्रोफाइट्स). वनस्पतींच्या आसमंतातील पाण्याच्या प्रमाणानुसार त्यांचे जलवनस्पती, ⇨मरुवनस्पती व ⇨ मध्यवनस्पती असे तीन गट मानले आहेत. [→ परिस्थितिविज्ञान]. संपूर्णतः किंवा अंशतः पाण्यात वाढणाऱ्या किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या वनस्पतींना व सर्वसामान्य वनस्पतीपेक्षा अधिक पाणी असलेल्या जमिनीत(दलदलीत) वाढणाऱ्या वनस्पतींना ‘जलवनस्पती’ म्हणतात.समुद्र, नद्या, ओहोळ, तलाव, हौद, डबकी व तत्सम ठिकाणी ह्या आढळतात. पाण्यातील त्यांच्या स्थितीप्रमाणे त्यांचे निमग्न(बुडलेल्या), प्लवमान (तरंगणाऱ्या) आणि जलस्थलवासी असे भेद केले आहेत. संपूर्णतः पाण्याने वेढलेल्या वनस्पतींना निमग्न, अंशतः किंवा संपूर्णपणे पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींना प्लवमान, तर उथळ पाण्यात वाढत असल्याने वनस्पतीचा तळचा भाग पाण्यात व उरलेला भाग हवेत राहिलेला असणाऱ्या वनस्पतींना जलस्थलवासी म्हणतात.निमग्न वनस्पती निलंबित (लोंबकळत्या अवस्थेत) किंवा पाण्याखालच्या जमिनीत रोवलेल्या, तर प्लवमान वनस्पती मुक्तपणे तरंगणाऱ्या किंवा तळाशी रोवलेल्या असतात.पाण्यातील काही ⇨शैवले आणि एलोडीया (आ. १),ऑटेलिया (आ. ४), हायड्रिला, ⇨सवाला (टेप ग्रास),सेरॅटोफायलम (आ. २), नायास (आ. ३) इ. निमग्न असतात;अंबुली, काही शैवले, ⇨पाणकणीस, पॉलिगोनम, एक्विसीटम व मार्सिलिया [→ जल नेचे] इ. जलस्थलवासी व ⇨ शिंगाडा,पोटॅमोजेटॉन नटान्स (आ. ५), ⇨ डकविड (लेम्ना व वुल्फिया), केसर (जुसिया रेपेन्स) (आ. ६), पाण्यातील हायसिंथ, युट्रिक्युलेरिया (गेळ्याची वनस्पती), ⇨ गोंडाळ, ⇨कुमुद, सॅल्व्हिनिया, ॲझोला [→ जल नेचे] इ. प्रमुख प्लवमान होत.

जलवनस्पतींना जास्त पाणी व कमी ऑक्सिजन अशा परिस्थितीत रहावे लागत असल्याने त्यांच्या आकारमानात व शारीरिक संरचनेत बराच बदल झालेला आढळतो. त्या ओषधीय [→ ओषधि] व नरम असतात. काही मूलहीन(उदा., सेरॅटोफायलम, युट्रिक्युलेरिया) असून निमग्न वनस्पतींत मूलतंत्राची वाढ फार कमी असते; ते शाखाहीन किंवा अल्पशाखीय असते. मूलरोमांचा(मुळावरील शोषक केसांचा) व मूलत्राणाचा (मुळाच्या टोकावरील टोपीसारख्या आवरणाचा) येथे पूर्ण अभाव असतो. काही जातींत (उदा., लेम्ना ) मूलत्राणाची जागा मूलगोपांनी (पिशवीसारख्या टोपणांनी) घेतलेली असते.जलस्थलवासींत व प्लवमान जातींत मूलतंत्र अल्पशाखीय व अल्परोमयुक्त (कमी लवदार) असते. जुसिया रेपेन्स (हिं.केसर) च्या खोडापासून काही आगंतूक मुळे हवेत वाढतातव श्वसनाचे कार्य करतात (आ. ६ श्वसनमुळे). ती फुगीर ववायुकोटरयुक्त असतात. शिंगाड्याच्या खोडावरच्या तंतु-मुळांसारख्या अवयवांबद्दल मतभेद आहेत. जलवनस्पतीपाण्यात वाढत असल्याने पाण्याशी संलग्न असलेल्या सर्वभागांवरील ⇨ अपित्वचेद्वारे (सर्वांत बाहेरील पेशींच्याथराद्वारे)त्यांनापाणी शोषता येते वत्यामुळे पाणीशोषण्याचे मुळांचे कार्य गौण ठरून बऱ्याच वनस्पतींत त्यांना फक्त जमिनीत धरूनठेवण्याचे कार्य मूलतंत्र करीत असते. यांचे खोड बहुधा लांब कांड्यांचे व हिरवे असते,किंवा त्याचे रूपांतर तिरश्चर (खोडांपासून निघून जमिनीत वाढणारी दुर्बल फांदी),अपप्ररोह [ धावते; → गोंडाळ] किंवा मूलक्षोड [→ खोड] यांत झालेले असून पांढरेकिंवा तपकिरी असते. निमग्न जलवनस्पतींची पाने पातळ, लहान, लांब व अरुंदकिंवा खंडित असतात. यामुळे त्यांचा पाण्याच्या हालचालीला विरोध न होता जास्तीतजास्त शोषण होते. प्लवमान जलवनस्पतींत ती सापेक्षतः मोठी, अखंड, गोलसरअसतात. जलस्थलवासींच्या काही जातींत सर्व पाने सारखी तर इतरांत पाण्यातराहणारी पाने निमग्न वनस्पतीसमान व हवेतील पाने स्थलवनस्पतीसमान असतात, याला विषमपर्णत्व म्हणतात. उदा.,सॅजिटॅरिया, रॅनन्क्युलस, लिम्नोफिला, निंफिया, इ. वंशातील काही जाती.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate