অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झायगोफायलेसी

झायगोफायलेसी

झायगोफायलेसी

(गोक्षुर-गोखरू कुल). फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) ह्या वनस्पति-कुलाचा समावेश ⇨जिरॅनिएलीझमध्ये (भांड गणात) केला असून याशिवाय त्या गणात आणखी सहा-सात कुले अंतर्भुत आहेत. या कुलातील बहुसंख्य वनस्पती ओषधीय [⟶ ओषधि], क्षुपे (झुडपे) व वृक्ष असून उष्ण व उपोष्ण कटिबंधांत त्यांचे सु. सतरा वंश व शंभर जाती आढळतात.

पाने बहुधा समोरासमोर, क्वचित एकाआड एक, उपपर्णयुक्त, संयुक्त, द्वि-किंवा त्रि-दलिक (२-३ दलांची) किंवा पिच्छकल्प (पिसासारखी) असतात. उपपर्णे जुळी, सतत राहणारी व कधी काटेरी असतात; फुले द्विलिंगी, पांढरी, पिवळी, लाल किंवा क्वचित निळी असतात;  पाकळ्या सुट्या, चार ते पाच किंवा क्वचित नसतात; त्याखालची पुष्पदले (संदले) तितकीच, सुटी, क्वचित तळाशी जुळलेली; केसरदले चार ते पाच किंवा पाकळ्यांच्या दुप्पट वा तिप्पट, त्यांच्यासमोर व त्यांना चिकटलेली (अपिप्रदललग्न) असतात. परागकोश विलोल (सहजच हलणारे); किंजपुट क्वचित किंजल्कावर, कोनीय किंवा सपक्ष, चार ते पाच कप्प्यांचा असतो [⟶ फूल].

बीजके बहुधा दोन, क्वचित एक; फळ विविध प्रकारचे (मृदुफळ नसते), कधी दोन ते दहा खंडांत विभागणारे किंवा बोंडासारखे वा न तडकणारे व काटेरी असते. प्रत्येक कप्प्यात एक अथवा दोन बीजे, क्वचित अधिक. ⇨गोखरू (सराटा), हरमल, लिग्नम व्हिटी, धमासा इ. उपयुक्त वनस्पती  याच कुलात येतात. महाराष्ट्रात याचे  सु. आठ वंश व दहा जाती आढळतात.

 

लेखक: चौगले, द. सी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate