অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टेलँथीरा फायकॉइडिया

टेलँथीरा फायकॉइडिया

टेलँथीरा फायकॉइडिया : (कुल-ॲमरँटेसी). ही लहान, सरळ ⇨औषधी मूळची उष्ण अमेरिकेतील (ब्राझील) असून बागेत शोभेकरिता वाफ्यांच्या कडेने लावलेली सर्वत्र आढळते. खोड बारीक आणि तळाशी सरपटणारे पण पुढे वर चढणारे, कोनयुक्त, रेषांकित, गुळगुळीत किंवा वरून व पानांच्या बगलेत सूक्ष्म लवदार. साधी पाने समोरासमोर, पसरट किंवा खाली वळलेली, आखूड देठाची, रुंद, भाल्यासारखी, बारीक व टोकदार आणि तरंगित कडांची असून जुलै–सप्टेंबरात किरमिजी होतात. फुलांचे झुबके लहान, ०·६–०·८ सेंमी. लांब, बिनदेठाचे, एकेकटे किंवा जोडीने येतात. छदे निमुळती होत गेलेली, टोकदार व बाहेरील संदलापेक्षा बरीच लांब, केसरदले दहा व सर्व सारखी (त्यावरून नाव पडले) व त्यांचा पेला बनलेला; निम्मी वंध्य व निम्मी परागधारी [⟶ फूल; ॲरमँटेसी]. नवीन लागवड कलमे लावून (किंवा तळाशी विभागून) करतात. हिवाळ्यात काळजी घ्यावी लागते. वेळोवेळी छाटणी करून चांगल्या स्थितीत राखता येतात. आल्टरनँथीरा ॲमाबिलीस या नावानेही ही वनस्पती ओळखतात.

 

लेखक: ज. वि. जमदाडे

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 12/4/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate