অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना

ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना

ट्रॅडेस्कँशिया झेब्रिना

(इं. वाँडरिंग ज्यू, स्पायडरवर्ट; लॅ. झेब्रिना पेंड्युला कुल-कॉमेलिनेसी). ही जमिनीवर पसरत वाढणारी  ओषधी मूळची अमेरिकेच्या उष्ण भागातील (मेक्सिको) असून फांद्यांची टोके वर वळलेली असतात.

पाने मांसल, अंडाकृतीआयत, टोकदार असून वरच्या बाजूवर झीब्र्‌याप्रमाणे पट्टे (एक जांभळट व दोन पांढरे) असतात व ती खाली किरमिजी रंगाची व केसाळ असतात. आवरक (वेढणाऱ्या) देठाच्या तळाशी व टोकांशी केसांचा झुबका; फुले थोडी, बिनदेठाची, जांभळट लाल व प्रत्येकास तळाशी दोन गुलाबी छदे असतात.

संवर्त व पुष्पमुकुट नळीसारखे, पाकळ्या जुळलेल्या, केसरदले पांढरी, सहा व सारखी असतात. ऊर्ध्वस्थ किंजपुटात तीन कप्पे व प्रत्येकात दोन बीजके असून  बोंड त्रिखंडी  असते.

बागेत खडकाळ जमीन झाकण्यासाठी, कुंडीत किंवा लोंबत्या परडीत शोभेकरिता ही लावतात; कलमांपासून नवीन लागवड सहज होते. हिचा रूपेरी प्रकार विशेष लोकप्रिय आहे. सावलीत ओलसर जागी चांगली वाढते आणि नयनमनोहर दिसते.

 

लेखक: ज. वि.जमदाडे

ट्रॅडेस्कॅशिया झेब्रिना

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate