অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डिजिटॅलीस पुर्पुरिया

डिजिटॅलीस पुर्पुरिया

डिजिटॅलीस पुर्पुरिया

(सं. तिलपुष्पी; इं. कॉमन फॉक्सग्लोव्ह; कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ह्या सु. ०·६–१·८ मी. उंच, द्विवर्षायू, व कधी बहुवर्षायू (दोन किंवा अधिक वर्षे जगणाऱ्या) ⇨ओषधीचे मूलस्थान यूरोप व आशिया असून तेथून भारतात आणून तिची काश्मीरात लागवड केली आहे. दार्जिलिंगमध्ये व निलगिरीत केलेली तिची लागवड फारशी यशस्वी झाली नाही. तथापि तेथे १,५२०–२,६३५ मी.उंचीपर्यंत डोंगराळ भागात ती वाढलेली आढळते.

पाने सपक्ष (पंखासारखा विस्तारित भाग असलेल्या) देठाची व अंडाकृतीभाल्यासारखी, काहीशी लवदार, सुरकुतलेली व मूलज (मुळापासून किंवा जमिनीतील खोडापासून आलेली) असून प्रथम त्याचा गुच्छ येतो आणि पुढे वर्षानंतर त्यातून फुलोऱ्याचा दांडा येतो व त्यावर बिनदेठाची किंवा लहान देठाची पाने व तिळाच्या फुलांसारखी जांभळी, पिवळी किंवा पांढरी नलिकाकृती-घंटाकृती फुले एका बाजूवर मंजरीत येतात; बिया लहान, हलक्या व पुष्कळ असतात.

या ओषधीपासून डिजिटॅलीन हे औषध काढतात व त्याचा उपयोग हृदयाला उत्तेजक व पौष्टिक म्हणून करतात. याचा उपयोग १८७५ पासून केला जात आहे व त्याचे श्रेय डॉ. विल्यम विदरिंग यांना आहे. या औषधाने नाडी मंदावते, श्वसन सुलभ होते आणि हृदयाचे ठोके मंद पण जोराने पडतात; कधी वांत्या होतात.

लेखक: जमदाडे, ज. वि.

 

 

 

 

 

 

डिजिटॅलीस पुर्पुरिया (तिलपुष्पी) : (१) वनस्पती, (२) फुलोरा, (३) फुलाचा उभा छेद, (४) तडकलेले फळ, (५) बी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate